सृजन १

👁️🌴👁️
  🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘
                        *सृजन* १

            यमाई औंध,राजेंद्र गुरव
__________________________ . .

 *वेगवेगळ्या अनुभूती विचारांना गती देत असतात. अनुभूतींचा परिणाम संवेदनशील मनावर होत राहतो. यामधूनच विविध कला प्रकार उदयाला आलेले आहेत.*

 *माणसाच्या भावभावनांच्या खेळातून ,मंथनातून कला उदयाला येते . कधी जीवनाच्या रणकंदनातून तावून सुलाखून  जन्माला येते, असे म्हटले तर वावगे होणार नाही.*
 *चित्र ,नाट्य ,शिल्प, गायन-वादन इत्यादी विविध कला माणसाच्या भावभावनांचे व्यक्त रूप आहे, हे निश्चित!*

 *काम, क्रोध ,मद, मोह ,मत्सर,दंभ विविध षड्रीपु ,सुखदुःख त्याचे आवेग माणसाच्या विविध आत्मिक प्रतिसादाला जन्म देतात.*

*काही संवेदनशील माणसं या आपल्या आवेगांना विविध रुपात व्यक्त करतात,अमूर्त भावनेला कलेचे मूर्तरूप देऊन जातात*

*एखादा कवी काव्यातून व्यक्त होतो. एखादा चित्रकार चित्रकलेत जीव ओततो. एखादं काव्य जन्माला येतं कारण हृदय तीरावरती कुठलातरी भाव रुजलेला असतो*

*उस्फूर्त गाणे हे त्या रूजलेल्या विचारांचे देणं होऊन जात! नेहमीच्याच जंगलात, लाकूड फाट्यात लपलेले चेहरे भाव-भावना काष्ट शिल्पकाराला आव्हान देतात. त्यांच्या शोधक नजरेतून काष्ट शिल्प उदयास येतात. संगीतकाराच्या हृदयाने छेडलेली एखादी बीट ,संगीत होऊन जन्माला येते. काव्य आणि संगीत एकत्र येऊन काव्यानंद निर्माण होतो.*

 *चौसष्ट कलांचा नेहमीच उल्लेख केला जातो आणि मग जाहिरात 65 वी कला मानली जाते. अशा अजूनही अनेक कलांचा उल्लेख करता येईल!*

*कलेची उत्पत्ती ही कलाकाराच्या सृजनाचं, त्याच्यातील सृजनशक्तीच देणं असतं! कधीकधी कलाकाराच्या मनातील द्वंद्व ही कलेत उतरतं. आनंदाबरोबर त्याच्या मनातील नैराश्यही अर्थात भावभावनांचे विश्व कलाकृतीचे बोट धरून जन्माला येतं*.

*कला ही धर्मपंथ वा उच्च नीच भेदांच्या पलीकडे गेलेली असते आणि खऱ्या रसिकाला ती अशीच भेदाच्या भिंतीच्या पलीकडे घेऊन जाते.*

*शास्त्रीय संगीतातील अनेक घराने आणि त्यांच्या चालत आलेल्या परंपरा पाहिल्या की शास्त्रीय संगीताचं विस्तीर्ण जग आपल्याला अनुभवायला मिळते. तसेच मोठ्या कलाकारांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांच्यामुळे कलेच्या विराट रूपाचं दर्शन आपल्याला घडत राहतो*

*कला ही ईश्वरी देणे आहे .नक्षत्रांचे देणे आहे. कला ही विकसित मानवाचं चिन्ह आहे.त्याच्या भाव-भावनाचे परिमार्जन आहे. भावभावनांच्या उन्नतीचे लक्षण आहे. कला माणसाच्या जीवनाचे सार आहे आणि आपलं जगणं आणखीन उदात्त, उन्नत, उत्तम करण्याचा विचार आहे.*

🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०
☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510