Posts

Showing posts from 2020

बायको आणि मैत्रिण

 बायको आणि मैत्रिण बायको अद्वैत सोबती नवऱ्याच्या अस्तीत्वाची गती त्याच्या व्यवहाराची मती बायको विना ना प्रगती ॥ बायकोनं बायको असावे शिवासह शक्ती व्हावे संसाराच्या गाडयातही सहजीवनी दुसरं चाक रहावे ॥ बायकोची जागा खास त्याला नाही रिपलेसमेंट बायकोला बदलला पारा संसारच उभा चेकमेट ॥ बायको घराचा आधार  वैभव गोकुळीचे पैलतीराकडे जाण्याचा  सोपान नियतीचे ॥ मैत्रीणही जीवनाचा आधार मैत्र झगडे होण्या स्वप्न साकार मैत्रीण म्हणजे कार्याची उत्प्रेरक गती वाढवी, थाप देई साधार ॥ जीवनात नाना विषयी गुंता हरदिन वाढवी मानवी चिंता योग्य साथ सल्ला आचार मित्र _ मैत्रीण घालवी भ्रांता नवऱ्याला मैत्रीण असावी बायकोला मित्र असावा हे मैत्र जीवीतांचे पूरक ठरावे जीवन वाहणे समृद्ध व्हावे ॥ 

काही कविता

 [19/09, 1:51 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: हे असे तुझे मागणे  बरे नाही झुरणे,मरणे,मागे फिरणे बरे नाही ॥ जे तुज मिळाले त्यात संतुष्ट होणे बरे ( ते शक्य नाही,असे बरळणे बरे नाही ) सावर स्वतःला आता,तो क्षण मोहाचा आवर स्वतःला,घसरणे बरे नाही ॥ होते पहा जीवनाची सहज राखरांगोळी मग आपुलीच अफवा उसवणे बरे नाही [20/09, 5:11 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: आता चेहरा न्याहाळतानाही आडवा येतो नीत (च ) चष्मा वाढला नंबर कितादा हा तो दाखवी सदा करी१मा | आता थांबायाचे कोठे ? कळत नाही शतदा : ते वाहवांचे वळण सरळ भासते कितीदा ! मुलायम रेशमी ज्वर जाणवे झिंग स्पर्शाला नवा झाज न मढवू पुन्हा त्या हर्षाला ॥ कुंतल रेशमी बटा ना राहिल्या बादल घटा काळ्याकुट्ट अंधारीही चाचपडी जणू जटा ॥ आता चालणे होत असे पचवीत कित्येक आचके अदा आमुच्याही आता  यारों जरा हटके  .. !                     राजेंद्र गुरव यमाई औंध                    ९५६११५४१४० [20/09, 6:28 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: सूर जुळला सूर जुळला प्रिये तुझ्य...

Kahi kavita

 [02/10, 10:22 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: स्थिती : गुलामगिरीची जणू भारता परंपरा बद्ध कित्येकदा परतंत्राने धरा  जळूनी मेली  मुर्दाड मती परशक्ती पुढे कोणाची छाती ॥ विविध भाग,भिन्न संस्कृती ५५० संस्थानी तुकडे भाषा,भूषा ,विविध गती त्यास एकात्मतेचे साकडे ॥ आपल्याच नादी सामान्यांचे जगणे सत्ताधीश कोण ? ना देणे घेणे बेडकांचे जणू डबके विहरणे जगणे असे जणू शतदा मरणे ॥ म गांधी : हे राष्ट्र आपले आहे सर्वांस दिली स्वःची जाणीव दया उधळूनी गुलामगिरी.. मनामनातील जागवी नेणीव ॥ एकटा काय करू ? ना बाळगू खंत ठाम करू जरी सुरवात संत  मग ब्रिटीश सत्तेचा करूया अंत रूजविला प्रयत्ने मंत्र जनमानसात ॥ प्रश्नांच्या मूळाशी जाणे निर्भयतेने त्याला भिडणे उत्तरासाठी सदैव झगडणे माणसांचे मग आतून घडणे ॥ माणूस माणूस हृदय जोडले एक भारतीयत्व सद्कार्ये घडले अनेक त्यागी जीवन सांडले काळाशी स्वातंत्र्यसमर मांडले ॥ राष्ट्र जोडणी पेरुणी ममता अखंड एकसंघ सांधली जनता नेताजी जाणे आपुला राष्ट्रपिता जग वंदीते उत्तुंग महात्मा ॥ @राजेंद्र गुरव [04/10, 10:56 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: *सांजवेळी* निष्पर्ण वृक्षाखाली पडला...

या झोपडपट्टीत माझ्या

 [19/09, 1:51 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: हे असे तुझे मागणे  बरे नाही झुरणे,मरणे,मागे फिरणे बरे नाही ॥ जे तुज मिळाले त्यात संतुष्ट होणे बरे ( ते शक्य नाही,असे बरळणे बरे नाही ) सावर स्वतःला आता,तो क्षण मोहाचा आवर स्वतःला,घसरणे बरे नाही ॥ होते पहा जीवनाची सहज राखरांगोळी मग आपुलीच अफवा उसवणे बरे नाही [20/09, 5:11 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: आता चेहरा न्याहाळतानाही आडवा येतो नीत (च ) चष्मा वाढला नंबर कितादा हा तो दाखवी सदा करी१मा | आता थांबायाचे कोठे ? कळत नाही शतदा : ते वाहवांचे वळण सरळ भासते कितीदा ! मुलायम रेशमी ज्वर जाणवे झिंग स्पर्शाला नवा झाज न मढवू पुन्हा त्या हर्षाला ॥ कुंतल रेशमी बटा ना राहिल्या बादल घटा काळ्याकुट्ट अंधारीही चाचपडी जणू जटा ॥ आता चालणे होत असे पचवीत कित्येक आचके अदा आमुच्याही आता  यारों जरा हटके  .. !                     राजेंद्र गुरव यमाई औंध                    ९५६११५४१४०  सूर जुळला सूर जुळला प्रिये तुझ्यासवे एकदा मग मिळूणी चालणे  झाले...

शंभर कविता एकत्र

 [28/03, 4:02 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: स्वतःचे गर्भारपण सांभाळत देशाप्रती मती अर्पण माणूसकीचे आदर्श दर्पन अभिवादावे असे ईश्वरी वर्तन [03/04, 9:23 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: नात्यांच्या बंधाकडे पाहू न शकलो एकटक अधूनमधून दरव्याज्यावर  करावी टकटक [08/04, 10:14 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: रुक्ष वाळवंटी आकांत माझा ओऑसिसचा छंद मना ध्यास हा मनी जडला तुझा [12/04, 11:34 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: जलामध्ये मारण्या सूर मी केव्हांचा आतूर दाह होत असे चहूबाजूंनी मी चिंब  तव मस्तीत चूर [12/04, 11:37 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: परिस्थितीला मी शरण निसर्गाचेच आवाहन हॅण्डस अपचा दैवी इशारा हात उभारी मी बेचारा | [12/04, 11:41 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: योगी निद्रीस्त बनूनी मी जागवी कुंडलिनी षड्रीपुंचा आवळी सर्प भावनांचा सुमार दर्प स्थितप्रज्ञ मी योगी बनूनी जरी षड्री पू राही आवळूनी I [12/04, 11:47 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: झटली जरी कितीदा वसना मी सावध चालली विपश्यना [12/04, 11:51 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: मी मुरलेल्या पुढारी कोलांटीची हौस भारी संधी मिळताच क्षणी  काढी स्व...

उदयाच्या

 उद्याच्या उदयाची मी कशी करु आशा दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥ स्वप्नं माझी सदैव तयार भ्रमंतीला हट्ट किती पुरवावा,घोर लागे जीवाला कशी करू जुळणी, पुरवू हर मनीषा दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥ नियतीच  धक्कादायी,जर धोकेबाज साधला लॉकडाउनचा कावा कावेबाज आता मोडला कणा,कधी फुटेल उषा ? दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥ संपले आता सारे ,भाव दाटे थराला  पुनः करु सुरवात किती समजावे मनाला जोमाने दे धक्का, नियते जागवी दिशा दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥
Image

अथांग सागर, ओंकार मला भिजवू शकेल, उदय-. अत्तरचे भाव, प्रकाशवाटा

Image

कैवल्यमूर्ती कृष्णाजी गुरव

Image

स्मरण प्रियेचे

Image

कटिजाल

Image
Image

मिकी माऊस

Image

वावटळ - संकट, उतरणाऱ्या यातना, उगवला सूर्य, आई आणि मूल, फळ की तेजाचा गोळा

Image

फिसकटलेला रवी, पाऊल ध्येयाकडे, डास, पहाट

Image

दोन मगर,ऍना कोंडा, हडळ, माझ्या मना बन दगड, जुळी मगर

Image

पाऊस -सृजन

Image

दुःखाचे गणित

Image

मृग आणि चातक

Image

प्रार्थना सर्वांसाठी

Image

दुहेरी आफत

कोरोनाच्या महामारीत प्लेगची कशाला आठवण ? 🤹🏼‍♀️ भयकंपीत माणसाने कशाची करावी साठवण ?😅 मानवजाती भेदरून गावाबाहेर फेकलेली प्लेगची दुसरी आफत शतकापूर्वी अनुभवलेली ॥🙊 पिंपात मेलेला उंदीर🐁 उचलला शेपटी धरून मनात झालं चरं आतून गेला हादरून ॥🥶 पोटात आला गोळा आठवूनी काखेतील गाठ असल्या पण विषयांशी कवीची पडावी गाठ  ॥😜 एक म्हणे ड्रॅगनची भीती तुम्हांला टाकेल हादरून🦖 एक म्हणे चिंता माझी टाकेल आतून कुरताडून ॥🐀 भीती आजारांची विषयांवर आली काष्ट शिल्पाची दुक्कल मानवावरील संकट पळवूनी लावू लढवूनीया शिस्तप्रिय  शक्कल ॥⚡💥

तो

काहीही म्हणा तो संसाराचा कणा घरादाराचा तंबू त्याच्याविना उणा ॥ रुंद त्याची छाती अनं बळकट खांदा अनेक रुपे अनेक मार्गे तो जगाचा पोशिंदा ॥ आघाडीवर लढून झेली संकटाचा मारा जीवन कसरतीने सांभाळी जगाचा डोलारा ॥

सृजन मन

कष्ट करुनी थकलो आता आलो निवासस्थाना काही हरवले - गवसले परि ना कोणता बहाणा ॥ जे.जे आले समोरा त्या त्या गेलो सामोरा केले सहजच सारे ना तऱ्हा, वेगळा तोरा ॥ आतुर मी क्षणिक निशेच्या कवेत सामावन्या ही झिंग अथक कष्टाची उतरेल झोपेत माझ्या ॥ वाकला जरी आज व्यस्त कामाने कणा उदया उभारीन पुन्हा खुणगाठ सृजनमना ॥

नवीन ४ प्रतिक्रिया - उदय, कवनप्रीत, उद्धव

[30/05, 7:25 AM] guravrajendra546: वा ! उदयजी वा ! १ाब्द कळा पाहून भरून आनंद मनात सौंदर्यही आरसपानी फुले प्रत्येक रोमात ॥ [30/05, 8:17 AM] guravrajendra546: प्रतिमेहूनी प्रतिभा व्हावी येथ उदात्त उदयजी शद्ब आपुले रुतून राहती मनात 🌟🌟 [30/05, 8:28 AM] guravrajendra546: वा ! कुणाच्या मनी दाटावी पुन्हा ओढ मानवी मनाची ही उदात्त खोड ॥ कवण आणि प्रीत दोन्ही शब्दात सांधलेले ते कोवळे प्रेम शब्दाशब्दात मांडलेले ॥ [30/05, 8:32 AM] guravrajendra546: मन हरळूनी जाते पहाता जीवंत चित्रा उद्धवा,सजग तुझा कॅमेरा क्या बात है मित्रा ॥

म गांधीजींचा परिसस्पर्श

🇮🇳🇮🇳 *परिसस्पर्श* सामान्यांना नव्हत्या राजकीय आकांक्षा राजसत्तेच्या खिजगणीत त्यांच्या अपेक्षा परंपरेची मानसिक ,राजकीय गुलामगिरी.,  समता कोठे?...सदा लोकांची उपेक्षा ॥ भरडून जाणे , पिचत पडणे वरूनी चाले - परंपरेचा वरवंटा थपडा खाणे, वाकून जगणे , एकवार विरोधक ठरे करंटा ॥ सत्ताधांच्या साठमारीत सामान्यांचे  अस्तित्वच लपणे त्यांचे अश्रू,दुःख अपार गांधींनी  सह्रदयतेने जाणणे ॥ सलामीलाच त्यांनी हे दैन्य टिपले I राजदरबारी परखड स्पष्ट सत्य मांडले लोकांना, पीडीतांना,श्रमवंताना आपली भाषा बोलणारे, दुःख मांडणारे गांधी आपुले वाटले ॥ सीमीत असलेली राष्ट्रसभा गांधींनी गावोगावी नेली सर्वसामान्यांची नेतृत्व त्यातूनी पुढे आली ॥ चंपारण्य,अमदाबाद खेडा आंदोलनानी रान उठवले सामान्यांचे प्रश्न कसे सोडवावे भारतावर्षात पटविले, रुजविले ॥ आंदोलनातूनी प्रश्न सोडविले असंख्य लोक नेते जोडले संसारी स्वप्नं अपेक्षा सोडूनी भारताचे चरणी सर्वस्व अर्पिले ॥ जे येवूनी त्यांना मिळाले सर्वस्वी त्यांचे झाले सरदार, राजेंद्रप्रसाद इ नेताजी एक जीव कायम राहिले ॥ २७ वी वर्षाचीअखंड ...

पहाट

👁️🌴👁️   🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘                         *सृजन* २               यमाई औंध,राजेंद्र गुरव __________________________ . .  *पहाट* झुंजूमुंजू होते..  आणि जगाचा पुन्हा जन्म होतो. पक्ष्यांची किलबिलाट सुरू होते.  दूरवर मोरांचं ओरडणं कानी पडते. पानांची सळसळ वाढू लागते.  सूर्याच्या आगमनाचे पडसाद उमटू लागतात . उषा रंगीबेरंगी कपड्यात स्वागताला सज्ज होते. आणि तेजोनिधी भास्कराचे आगमन होतं !  सूर्य म्हणजे चराचराची चेतक शक्ती !  सूर्य म्हणजे ऊर्जेचा महा स्त्रोत !  सूर्य आपल्या रवी करांनी डोंगर-दऱ्या एकेक भुभाग पादाक्रांत करत राहतो. सारी पृथ्वी कल्याणी प्रकाशित होते.  सर्व चराचर जागे होतात . कष्टाळू शेतकरी भल्यापहाटे  उठतात आणि आपल्या कामाची सुरुवात करतात. पूर्वीच्या काळी बाया-बापड्यांचा दिवस तर रामप्रहरी सुरू व्हायचा. सकाळचे साफसफाई ,सडा संमार्जन, रांगोळी ,सगळी इतर सफाई, स्नानादी कर्मे करून  गृहणी स्वयंपाकाला लागत. गोठ्याती...

सृजन १

👁️🌴👁️   🌿☘🍀🍂🍃🌺🌹☘                         *सृजन* १             यमाई औंध,राजेंद्र गुरव __________________________ . .  *वेगवेगळ्या अनुभूती विचारांना गती देत असतात. अनुभूतींचा परिणाम संवेदनशील मनावर होत राहतो. यामधूनच विविध कला प्रकार उदयाला आलेले आहेत.*  *माणसाच्या भावभावनांच्या खेळातून ,मंथनातून कला उदयाला येते . कधी जीवनाच्या रणकंदनातून तावून सुलाखून  जन्माला येते, असे म्हटले तर वावगे होणार नाही.*  *चित्र ,नाट्य ,शिल्प, गायन-वादन इत्यादी विविध कला माणसाच्या भावभावनांचे व्यक्त रूप आहे, हे निश्चित!*  *काम, क्रोध ,मद, मोह ,मत्सर,दंभ विविध षड्रीपु ,सुखदुःख त्याचे आवेग माणसाच्या विविध आत्मिक प्रतिसादाला जन्म देतात.* *काही संवेदनशील माणसं या आपल्या आवेगांना विविध रुपात व्यक्त करतात,अमूर्त भावनेला कलेचे मूर्तरूप देऊन जातात* *एखादा कवी काव्यातून व्यक्त होतो. एखादा चित्रकार चित्रकलेत जीव ओततो. एखादं काव्य जन्माला येतं कारण हृदय तीरावरती कुठलातरी भाव रु...

दोन काष्ठ - गरूड आणि नाग

Image

दोन काष्ठ, रमेश - अमूर्त कोंबडा, राहूल - डायनासोर

Image

चैतन्य साठलेली सकाळ आणी बगळा

Image

संत काशिबा गुरव महाराज

🕉🕉🕉🕉 युनोस्को प्रणित गांधीभवन,पुणे येथे झालेल्या *माझे सांस्कृतिक संचित माझा शाश्वत विकास*  या  जागतिक परिषेदेत सादर झालेल्या शोधनिबंधावर आधारित लेखमाला *भाग  २७*** *संत काशिबा गुरव महाराज*  अध्यात्मिक क्षेत्रातील एक थोर संत म्हणून काशिबा महाराज यांच्याकडे पाहिले जाते. इस 1250 ते 1295 असा त्यांचा कालखंड ! त्यांची समाधी अरणगाव येथे आहे. काशिबा महाराज यांचे कार्य -कर्तृत्व मोठे आहे आणि गुरव समाजाने यासंदर्भात अधिकचा अभ्यास करायला हवा. कारण संत सावतामाळी यांचे अभंग संत काशिबा महाराज यांनी लिहिलेले, हीच ठळक ओळख होऊन राहिली आहे.  त्यांच्या इतर कार्यावरही प्रकाश टाकायला हवा. संत सावता महाराजांचे अभंग त्यांच्या सिद्धहस्त लेखणीने ,आंतरिक आत्मीयतेने शब्दबद्ध झाले.  काशिबा महाराज यांचे मूळ गाव अरण जिल्हा सोलापूर. त्यांच्या जन्मतारखे विषयी व इतर प्रापंचिक माहिती आज निश्चितपणे उपलब्ध नाही.  संत जनाबाईंच्या रचनेत अनेक संतांच्या अभंग रचना कोणी केल्या याबाबत उल्लेख करताना आलेला एक उल्लेख आहे. *सावता माळ्याचा काशिबा गुरव कुरम्याचा वासुदेव काईत होता...

नागाचे पिल्लू, एक सूर्योदय, उन्मत्त हत्ती

Image

सहवास*

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग २८ यमाई औंध,राजेंद्र गुरव *सहवास* पावसाचा थेंब नभातून खाली पडला. शेतावर पडला आणि  बियांना सृजन देणारा झाला.उभ्या पिकाला नवसंजीवनी देणारा झाला. जीवास उभारी देण्याची शक्ती त्याला मिळाली. फुफाटयात पडला आणि त्याचा चिखल होऊन राहिला. गरम भांड्यावर पडला त्याची पुन्हा वाफ झाली आणि  शिंपल्यामध्ये पडला त्याचा सुंदर असा मोठी होऊन राहिला.  पाण्याचा- थेंब एकच पण त्याला मिळायला सहवास वेगळा आणी परिणाम वेगळा. सहवासाचा परिणाम  सांगणारी ही कथा ,कोठे तरी वाचलेली! एक साधू रस्त्याने चालले असतांना त्याना खूप तहान लागली, पुढे गेले तर एका कुंभाराच घर लागले, साधू तिथे गेले आणि पाणी मागितले त्यानेही त्या साधूंना आदर पूर्वक नमस्कार करून पाणी दिले, पाणी पीत असताना अचानक त्यांच लक्ष बाजूस ठेवलेल्या मडक्यावर गेलं, एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं, त्या साधूंनी त्याला विचारलं का रे बाबा इतकी मडकी एका बाजूस आणि ते एकंच मडकं वेगळ का रे बाबा ठेवलं आहेस? तेंव्हा तो म्हणाला, महाराज ते मडकं खराब आहे.. त्याला गळती लागली आहे....

जगनही जानन्या झालं मुश्किल

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग २७ यमाई औंध,राजेंद्र गुरव *जगनही जान्यां झालं मुश्किल !* कित्येक लोकांचे पुढे अनपेक्षित परिस्थिती !  नियोजनाला वेळ नाही आणि हाताशी फारशी साधने नाहीत. घरातील, बाहेरील उद्याचं चित्र स्पष्ट नाही .घरातील संपत आलेला बाजार... आणि तरीही माणसं लढतच आहेत. शासनावर या साऱ्याचा  फार मोठा भार असणार आहे. फार मोठी तरतूद जेवण आणि आरोग्य या दोन घटकांच्या करावी लागते आहे.  हातावर ज्यांचे पोट आहे अशी माणसं अगोदरच संसाराची दोन टोकं मिळताना मेटाकुटीला आलेली. दोन घासाची ज्यांना भ्रंत, त्यांना कशी मिळेल विश्रांत ! मिळेल ते खाणे . त्याचा दर्जा न पाहता खाली आणि पोटाची खळगी भरणे पोटाची आग शांत करणे. हे गरिबांच्या पाचवीला पुजलेले.... सज्जन शक्तीची सजगता एवढेच काय त्यांच्या हाती राहिले आहे. लॉकडाऊन होण्यासाठी माझ्याकडे घर आहे, दोन्ही वेळा भागवायला अन्नही पोटभर आहे ! १ मनोरंजन खूप आहे, टीव्ही आणि इंटरनेट, हवं ते मिळतंय सारं, एक फोन करता थेट ! २ दिवसभर व्हॉट्स अप चालू, भ्रमणध्वनी हाताशी, कपाटात पुस्तकांच्या रचून ठेवलेल्या राशी ! ३ खूप जरी नसले तरी ...

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग २९ यमाई औंध,राजेंद्र गुरव 🇮🇳 *महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या अनेक शुभेच्छा!*  महाराष्ट्राला स्वतःचा वैभवशाली इतिहास आहे... आणि वैशिष्ट्यपूर्ण भूगोल ही. वैभवशाली महाराष्ट्र  भारताचा एक भाग !चालुक्य ,वाकाटक, शिलाहार ,यादव, छत्रपती शिवराय अशा उत्तुंग राजवटी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत.  महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर स्वतःची अशी एक संस्कृती हजारो वर्ष निपजत असलेली दिसून येते.  आजही महाराष्ट्र म्हणजे भारत देशाचे चैतन्य आहे. अनेक आर्थिक वाहिन्या महाराष्ट्रातून वाहतात. मजबूत भारताचा महाराष्ट्र म्हणजे कणा आहे. * महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो! दिनदिन महाराष्ट्र चमकत राहो ! उन्नत होऊन पोषित होऊ दे  दहा दिशांनी विकसित होऊ दे ! प्रगतीच्या वाटा अखंड चालो महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो॥  संतांची ,योग्यांची ही भूमी शुर विरांची  कर्मवंतीची भूमी देशाच्या विकासाला हातभार  लागो महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥  महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकच  आकांक्षा  रुळा...

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा*

👁️🌴👁️वाचावे आनंदे ३० 🕉🕉🕉🕉 *महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा* या विषयावरील शोधनिबंध माननीय श्री सदानंद आगलावे जेजुरी  यांनी सादर केला होता.  ते म्हणतात - ' ' उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा !  खंडोबाम्हणजे साक्षात शिव शंकराचा अवतार असं म्हणलं जाते. कृतयुगामध्ये मणी आणि मल्ल या दोन देवतांचा दैत्यांचा बिमोड करण्यासाठी भगवान शिवांनी जो अवतार घेतला तो खंडोबा.  अवताराचा दिवस होता चैत्री पौर्णिमा. देवाचे अवतार स्थान कही पठार (कडेपठार ) तर देवानी राक्षसाला मारलेला दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपा अष्टमी. महादेवांनी हातात खड्ग घेऊन राक्षसाचे खंडन केले म्हणून खंडोबा नामाधिमान  !  देवांची पत्नी माळसादेवी अर्थात साक्षात पार्वती माता ! जेजुरी या तीर्थस्थळी दोघांचे एकत्र स्वयंभू लिंगस्थान आहे .त्यामुळे नवदांपत्यांना जेजुरीला दर्शनासाठी आणतात अशी प्रथा  ! मल्ल दैत्याचा संहार केला म्हणून देव मल्हारी नाम पावला.  सदा आनंद निर्माण करणारा भक्तांसाठी तोच सदाआनंद झाला आहे. भंडारा उधळताना सदानंदाचा येळकोट असा जयजयकार करत...

रणशिंगांची रणधुमाळी*

👁️🌴👁️ वाचावे आनंदे - ३१ *रणशिंगांची रणधुमाळी*  शिंग म्हणजे चैतन्य,स्फूर्ती.. अंगात शिरणारे वारे !  शिंग, तुतारी ,रणशिंग, मोगलशिंग पिंपोळी इत्यादी अनेक नावाने शिंग ओळखलं जायचं .स्वागतासाठी, स्फूर्ती दायक वातावरणासाठी  शिंग आणि युद्धभूमीवर ही रणशिंग फुंकले जायचं  उत्सव समारंभ यांची सुरुवात, पाहुण्यांचे स्वागत यासाठी शिंग फुंकले जाते.  भगवान शंकरांचे पाच शिष्य, त्यातील शृंगी नावाच्या शिष्याने महादेवांच्या विवाहावेळी नंदी बैलाचे शिंग  वाजवले. मंगलमय वातावरणात पुष्पवृष्टी वेळी, शिंग वाजले तेव्हापासून लग्नकार्यात शिंग वाजवण्याची प्रथा प्रचलित आहे .शृंगी यांनी आपल्या ओठाच्या साह्याने एकाच श्वासात  फुंकून जो नाद निर्माण केला ता शिंगनाद  म्हणून आजही प्रसिद्ध आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात शिंगाचे स्वतःचे महत्त्व आहे.   गडावरून पायथ्याशी असणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला तुतारी मार्फत वेगवेगळे संदेश दिले जात . शिंगाचा जणू मोबाईल झालेला. तसेच युद्धात स्फूर्ती देण्यासाठी हर हर महादेव ,जय भवानी या गोष्टी बरोबर रणशिंगाची ही सा...

आळंदीतील गुरव समाजाची पूर्वपीठीका व थोर संत ह भ प पानसरे महाराज गुरव*

👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* भाग ३३ यमाई औंध,राजेंद्र गुरव 🕉🕉🕉🕉 *आळंदीतील गुरव समाजाची पूर्वपीठीका व थोर संत ह भ प पानसरे महाराज गुरव* हा शोधनिबंध ॲड कृष्णाजी ज्ञानेश्वर पानसरे यांनी सादर केला होता.  या शोधनिबंधाचे सुरुवातीला गुरव समाजाच्या संबंधीने काही बाबींचा उल्लेख त्यांनी केलेला आहे . संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी ,हजारो वर्षापासून सिद्धेश्वराचे मंदिर आळंदी येथे आहे व गुरव समाजातील पुजारी हजारो वर्षापासून तिथे पूजा-अर्चा करीत आलेले आहेत . संत नामदेव म्हणतात *आळंदी हे गाव! पुण्यभूमी ठाव! दैवताचे नाव! सिद्धेश्वर!* ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंती शेजारी ग्रामदैवत भैरोबाचे मंदिर आहे व अशी वंदता आहे की, त्या मंदिराखाली काशीची गंगा गुप्त रूपाने आहे व नदीच्या काठी  मणिकर्णिका घाटावर ती अवतीर्ण झाल्याचे दिसते. येणारे भाविक सारे तीर्थ अवश्य घेतात. दर्शनास गेलेल्या भक्तास गुरव ही माहिती अवश्य देतात . 1920 च्या सुमारास आळंदी तीर्थक्षेत्र येथे गुरवांची बहुसंख्य घरे होती.  गुरवांची प्रामुख्याने आडनाव वाघमारे आहे. त्यासंबंधी कथा सांगितली जाते सिद्ध...