Kahi kavita
[02/10, 10:22 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: स्थिती :
गुलामगिरीची जणू भारता परंपरा
बद्ध कित्येकदा परतंत्राने धरा
जळूनी मेली मुर्दाड मती
परशक्ती पुढे कोणाची छाती ॥
विविध भाग,भिन्न संस्कृती
५५० संस्थानी तुकडे
भाषा,भूषा ,विविध गती
त्यास एकात्मतेचे साकडे ॥
आपल्याच नादी सामान्यांचे जगणे
सत्ताधीश कोण ? ना देणे घेणे
बेडकांचे जणू डबके विहरणे
जगणे असे जणू शतदा मरणे ॥
म गांधी :
हे राष्ट्र आपले आहे
सर्वांस दिली स्वःची जाणीव
दया उधळूनी गुलामगिरी..
मनामनातील जागवी नेणीव ॥
एकटा काय करू ? ना बाळगू खंत
ठाम करू जरी सुरवात संत
मग ब्रिटीश सत्तेचा करूया अंत
रूजविला प्रयत्ने मंत्र जनमानसात ॥
प्रश्नांच्या मूळाशी जाणे
निर्भयतेने त्याला भिडणे
उत्तरासाठी सदैव झगडणे
माणसांचे मग आतून घडणे ॥
माणूस माणूस हृदय जोडले
एक भारतीयत्व सद्कार्ये घडले
अनेक त्यागी जीवन सांडले
काळाशी स्वातंत्र्यसमर मांडले ॥
राष्ट्र जोडणी पेरुणी ममता
अखंड एकसंघ सांधली जनता
नेताजी जाणे आपुला राष्ट्रपिता
जग वंदीते उत्तुंग महात्मा ॥
@राजेंद्र गुरव
[04/10, 10:56 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: *सांजवेळी*
निष्पर्ण वृक्षाखाली
पडला आठवणींचा सडा
घ्या भरुनी ओंजळ
गुंतुनी गतकाळा भिडा ॥
ना राहिले गुंजण
पर्ण-लतिकेंचे सहाबहार
ना मोहणारी फुले
खुणा अंगाखांदयावर ॥
हा सडा आता पुनः
भूतकाळाचा साक्षीदार
वैभवशाली कालची
प्रतिबिंबे उमटवणार II
तुम्हां आता वेचायचे?
ते वाकूनी वेचा
टाचाखाली हव्या तर
थोडया कळ्या ठेचा ॥
॥ .
दात पडूनी मागे
हिरडया राहील्या
काळचक्रा पायी
कार्यपंक्ती वाहिल्या ॥
आता हास्य हे
भासे दंतहीन भेसूर
शोधा मधाळ त्यातही
सापडे अनुभवी सूर ॥
माझ्या वेदनांचे गाणे
सजवती माझी अंगणे
सांजवेळी तिरीप किरणांची
खुणावती क्षितीजे ॥
[06/10, 8:40 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: अनुभवांचा मेळा
सुरूकत्यांच्या वेळा ॥
एक एक आठी
अनेक आठवणी पाठी
एक एक सुरुकूती
जीवना नितअनुभूती ॥
हा अनुभवांचा
रसाळ कुंभमेळा
जीवनात क्वचित
अशा साधती वेळा ॥
जीवनात चाले ना बहाणा
पुढच्यास ठेचा मागचा शहाणा ॥
पांथस्तानो बसा सावलीला
ऐका,अनुभवा त्यांच्या लिला ॥
[07/10, 7:31 PM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: 🌹 ती मुग्ध कळी
ती मुग्ध स्तब्ध कळी
मनात रुतूनी बसली
जणू लावण्याची खणी
तारुण्यतिरावरी वसली ॥
शब्द अबोल मुग्धबालेचे
परी अस्तीत्व बोलते
मंतरलेल्या बहूलोकांची
नजर सदा ती तोलते ॥
ओढूनी घेतो गंध
करी हालचाली मंद
हेलपाटी जीवाला
लावी आगळा छंद ॥
नजर करी काबीज
विचार बीज ओढुनी
गुंजारती नित भ्रमर
लोकलज्जा सोडुनी ॥
ढळला हिरवा पदर
अवचित माथ्यांवरूनी
गुलाबी रहस्य सदर
वाहते ओसांडूनी ॥
भ्रमराची बाधी होऊनी
कित्येक झाले भ्रमित
वर ' प्राप्त एखादयास
बाकी नको ठरू शापीत ॥
[08/10, 9:49 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव: या आव्हानीत दाही दिशा
असोत कवेत माझ्या
सूर्योदयाची नितनवा प्रारंभ
कर्तृत्वाच्या आठवणी ताज्या ॥
तेजाच्या अमृत शिंपनाने
गात्रे पुलकीत व्हावी
वाऱ्याच्या मंद लहरीने
रोम रोम रोमांचीत व्हावी ॥
.
नवीन स्वप्ने पडावी
तेजोनिधी झगमगताना
पुन्हा उमेद घडावी
पहाट -रात जागविताना ॥
कर्तृत्वाचा विशाल पट
विस्तृर्ण उलगडत यावा
क्षितीजरेषा विलीन व्हावी
पल्याड जाण्या योग यावा ॥
Comments
Post a Comment