उदयाच्या

 उद्याच्या उदयाची मी कशी करु आशा

दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥

स्वप्नं माझी सदैव तयार भ्रमंतीला

हट्ट किती पुरवावा,घोर लागे जीवाला

कशी करू जुळणी, पुरवू हर मनीषा

दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥


नियतीच  धक्कादायी,जर धोकेबाज

साधला लॉकडाउनचा कावा कावेबाज

आता मोडला कणा,कधी फुटेल उषा ?

दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥


संपले आता सारे ,भाव दाटे थराला

 पुनः करु सुरवात किती समजावे मनाला

जोमाने दे धक्का, नियते जागवी दिशा

दाटले मळभ,अंधारले,घुसमटे निराशा ॥

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510