बायको आणि मैत्रिण
बायको आणि मैत्रिण
बायको अद्वैत सोबती
नवऱ्याच्या अस्तीत्वाची गती
त्याच्या व्यवहाराची मती
बायको विना ना प्रगती ॥
बायकोनं बायको असावे
शिवासह शक्ती व्हावे
संसाराच्या गाडयातही
सहजीवनी दुसरं चाक रहावे ॥
बायकोची जागा खास
त्याला नाही रिपलेसमेंट
बायकोला बदलला पारा
संसारच उभा चेकमेट ॥
बायको घराचा आधार
वैभव गोकुळीचे
पैलतीराकडे जाण्याचा
सोपान नियतीचे ॥
मैत्रीणही जीवनाचा आधार
मैत्र झगडे होण्या स्वप्न साकार
मैत्रीण म्हणजे कार्याची उत्प्रेरक
गती वाढवी, थाप देई साधार ॥
जीवनात नाना विषयी गुंता
हरदिन वाढवी मानवी चिंता
योग्य साथ सल्ला आचार
मित्र _ मैत्रीण घालवी भ्रांता
नवऱ्याला मैत्रीण असावी
बायकोला मित्र असावा
हे मैत्र जीवीतांचे पूरक ठरावे
जीवन वाहणे समृद्ध व्हावे ॥
Comments
Post a Comment