Read by me 4 , वाचलेले लेख ४

"मी वाचलेले काही लेख ४ .
                 यमाई औंध, राजेंद्र गुरव

"अभिमान वाटण्यासारख्या ज्या उज्ज्वल घटना भूतकाळात घडलेल्या असतात, त्यांच्याविषयी आपल्या मनात गौरव वाटणं स्वाभाविकच असतं. ज्यांच्यामुळं त्या घटना घडलेल्या असतात, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता जरूर बाळगली पाहिजे. त्याचं यथोचित स्मरणही ठेवलं पाहिजे. ते संतुलित मार्गांनी व्यक्तही केलं पाहिजे. तसेच, वर्तमानकाळात आपली क्रियाशीलता योग्य दिशेनं वाढवण्यासाठी आणि भविष्यकाळात कर्तृत्वाची उंच शिखरं गाठण्यासाठी भूतकाळातील इतिहासापासून बोध आणि प्रेरणाही जरूर घेतली पाहिजे. अनेकदा बोधही घेतला जात नाही, कृतज्ञताही बाळगली जात नाही, प्रेरणाही घेतली जात नाही आणि मग महान वारसा देखील वाया जातो. भारतीय इतिहासात असं फार फार वेळा घडलं आहे. हे पुन्हा होऊ नये, म्हणून दक्षता घ्यायलाच हवी."

*(संदर्भग्रंथ : अंधाराचे बुरुज ढासळतील, प्रकाशन : लोकायत प्रकाशन, सातारा, लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ क्रमांक : १५)*

https://www.facebook.com/Subhashite/🦋☘🌷🌱☘🌷🦋
यमाई औंध, राजेंद्र गुरव
8275370028, gurarrajendra546@gmail.com🦅🐬🌿☘🌸🍃🌷

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510