वाचावे आनंदे_ मनोगत १

👁॥ *रंग प्रभातीचे.. आकाशीचे* ॥👁
माझी सकाळ सुरु होते एक तर श्री.यमाई पूजेने वा मंदिर नसेल तर पदभ्रमंतीने.. 
डोळे दृष्टाचा ठाव घेतात.. अन हृदय शब्दांचे पार्श्व संगीत !
जे कॅमेऱ्यानं टिपलं - ते तसेच मांडले !
जे सहज स्फुरले ते - सांडले.. उधळले !
कुणा त्यातील क्लिक आवडली कुणा शब्द !
कुणा छाया .. तेजाच्या कल्पना तर कुणा सूर्याच्या वल्गना !

मी काही कुणी व्यावसायिक छायाचित्रकार नाही.. पण एवढया लोकांना ते आवडावे .. कारण ते फोटो सर्वशक्तीमान सूर्याचे आहेत ! .

वाचावे आनंदाचे ३३ कोटी प्रकार अनं  व ज्याने रौप्य महोत्सवाचे पुढे गेलेला ' वाचलेल्या अन कुठंतरी साचलेल्या कविता ' -. ज्यावर रसिकांनी मोठ्या मनाने दसऱ्याची सोन्याची उधळण केली !

रंग प्रभातीचे .. हा उपक्रम माझ्या एका फोनमधील ५१ whatsapp.ग्रुप , दुसऱ्या फोनमधील ९ ग्रुप २ निवडक ब्रॉडकास्ट लिस्ट , माझे वैयक्तिक उपक्रम,.. माझे मित्रांचे मिडिया व न्यूज ग्रुपद्वारे असंख्य लोकांकडे रवाना होत आहेत.. आई जगदंबेची कृपा असावी !

सगळ्याचं प्रतिक्रिया पाहताही येत नाही. सूर्याचे तेज वर्णिता येत नाही . :
तरीही प्रसिद्ध छायाचित्रकार हुसेन साहेब ( वेलकमबॅक, देवदास फेम ) यांनी आवर्जुन प्रशंसा केली. ..

या उपक्रमास अनेकांचे आशिर्वाद मिळाले... प्रशंसा - शब्दफुले अनं शुभेच्छा , पुढील वाटचालीचे तहानलाडू + भूक लाडू ठरो !

💐☘🌷☘💥☘🌷☘
यमाई औंध राजेंद्र गुरव ९५६११५४१४०, ८२७५३७००२८💥💐☘💥💐☘🌷💐☘

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510