म गांधी आणि शिक्षण पद्धती
🌸🍃🍂🌺🍃🌸

 आफ्रिकेत असल्यापासून गांधीजींनी शिक्षणविषयक विविध प्रयोग
 केलेले होते. शिक्षणाविषयीच्या विविध कल्पना गांधीजींनी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. आपल्या लेखांमधून गांधीजीनी शिक्षण विषयक विचार चर्चा केली आहे.

*विद्यार्थ्यांचे चारित्र्य संवर्धन हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय असावे याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती*
 ज्या शिक्षणाने आपण चारित्र्यसंपन्न नागरिक बनवू तेच खरे शिक्षण असे ते नेहमी म्हणत .इंग्रजांचे शिक्षण हे जीवनाशी संबंधित नसणारे, विद्यार्थ्यांना परावलंबी बनवणारे ,देशी संस्कारापासून दूर नेणारे असे शिक्षण आहे .हे शिक्षण केवळ पुस्तकी आहे आणि या पुस्तकात शिक्षणातून केवळ पुस्तक पंडित निर्माण होणार असे गांधी  म्हणत. *शासन यंत्रणेसाठी  लागणारे केवळ कारकून या शिक्षणातून तयार होतील* शाळा म्हणजे असे एक कारकून निर्माण करणारे कारखाने आहेत असे गांधी म्हणत. आणि म्हणूनच असहकार चळवळीत विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा मध्ये शिकण्यापेक्षा राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवाहात यावे, अशा पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या शाळेतून शिकावे यावर गांधीनी भर दिला .राष्ट्रीय शिक्षणाच्या पाठशाळा व महाविद्यालय स्थापन करणे यावर गांधींचा भर होता.

 आफ्रिकेत असताना गांधीजींनी अभिनव शाळेचा प्रयोग केला होताच. ते स्वतः शिक्षक होते म्हणून तेथे कार्यरत होते. भारत देशातील विविध भागातून आलेल्या लोकांच्या शिक्षणाची सोय गांधीनी आफ्रिकेत केली होती. विविध भाषा आणि मूलभूत ज्ञान देणारे शिक्षण  देण्याचेगांधीजींचे  नियोजन होते. गांधीजींची शिक्षणासंबंधी एवढी तळमळ होती की मी देशाला काही गोष्टी दिले आहेत त्यातील माझी शिक्षणाची योजना ही  देशासाठी सर्वोत्तम भेट असेल देशासाठी असे गांधी म्हणत .

शिक्षण पद्धतीचा मूलभूत विचार झाला पाहिजे असे गांधींजी म्हणत. 1937 मध्ये ज्यावेळी भारतात निरनिराळ्या प्रांतात काँग्रेसची सरकार अस्तित्वात होती त्यावेळी वर्धा येथे त्यांनी भारतातील शिक्षण तज्ञांची एक परिषद भरवली आणि या सर्वांच्या पुढे आपली शिक्षण विषयक योजना मांडली .यावर साधक बाधक चर्चा घडवली गेली. शिक्षणतज्ञ आपली मते मांडून शिक्षण विचारांची देवाण-घेवाण झाली. गांधीजीनी शिक्षणाची योजना मांडली तीच पुढे  शिक्षण बुनियादी, किंवा वर्धा शिक्षण योजना या नावाने ओळखली जाते
 .
 त्याकाळी शिक्षणाची ही अभिनव पद्धती होती. काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने ही योजना राबविण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण देण्याऐवजी ,जीवनाला सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करणे, असे शिक्षण दिले जावे अशी यामागची भावना होती.
 मुंबई ,बिहार व संयुक्तप्रांत या भागात ही योजना विशेष उत्साहाने राबवली गेली. या योजने अंतर्गत मुंबई प्रांतात 59 शाळा सुरू झाल्या बिहारमध्ये तर 19 38 सालीच मूलभूत शिक्षण मंडळ स्थापन करून, पन्नास प्रयोगी शाळा स्थापन करण्याचा प्रयोग केला होता.

 या उपक्रमासाठी शिक्षक तयार करावेत म्हणून केंद्रीय प्रशिक्षण विद्यालय प्रस्थापित करण्यात आले हे प्रयोग काही प्रांतात 1947 पर्यंत . चालत आले होते.

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वावलंबी व्हावा. जीवन व शिक्षण एकत्र यावे बहुतेक शिक्षणाबरोबर शारीरिक श्रमाची, मेहनतीची कामे विद्यार्थ्याला करता यावी, उत्पादित स्वरूपाची प्रशिक्षण मिळावे. वस्तूंची विक्री करून मिळालेल्या पैशातून त्याच्या शिक्षणावरचा खर्च केला जावा असे या प्रयोगाचे स्वरूप होते.

या शिक्षण योजनेच्या संचलनासाठी गांधीजीना डॉक्टर झाकीर हुसेन यासारखा निष्णांत शिक्षण तज्ञ मिळाला .शिक्षणातून उत्पादित घटकांच्यावर भर दिला जावा. शिक्षण व उत्पादन व्यवसाय यांचा संबंध परस्पर संबंध जुळला जावा. शिक्षणातून स्वतःच्या पोटापाण्याची सोय प्रत्येक विद्यार्थ्याला करता यावी. अशा काही बाबींचा शिक्षणात समावेश असावा यावर गांधींचा भर होता. भौतिक सामाजिक परिसर व उत्पादन व्यवसाय यांचा अनुबंध अभ्यासक्रमास समाविष्ट व्हावा. शाळा व स्थानिक समाज यांचे. निकटचे संबंध असावेत. या वर्धा शिक्षण योजनेतील मूळ कल्पना होत्या .
अलीकडच्या काही शिक्षण पद्धतीमध्ये गांधींच्या या  विचारांवर आधारित शिक्षणाची आखणी त केली आहे.

 पण गांधींचे विचार शिक्षण परिषद, शिक्षण पद्धतीला आणि नोकरशाहीला पेलवले असे म्हणता येत नाही .
मंदीच्या अनुषंघाने आता चर्चा होत आहे.त्यावेळी म गांधींच्या विचाराचं स्मरण झालेशिवाय रहात नाही.

 समाजातील प्रत्येक घटकाला एखादं कौशल्य मिळावे .ते उत्पादित असावे व त्यातून  आर्थिक बळ मिळावं .  त्यातून समाजाचा विकास खचितच होईल.

 गांधींच्या या अभिनव शिक्षण पद्धतीचा अनेक तज्ञांनी गौरव केला आहे. काळाच्या या परिस्थितीतही पुन्हा म गांधींच्या शिक्षणपद्धतीचा विचार व्हावा.
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510