*जनआंदोलनाचे विराट पर्व*
🌸🍃🌺🍂☘🍂🌸
1920 चे असहकार आंदोलन भारताच्या इतिहासातील पहिलेच जन आंदोलन !गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या चळवळीमुळे लोकांच्यामध्ये चैतन्य पसरलं.
चौरीचौरा येथील हिंसक घटनेने गांधी व्यथीत झाले, चिंतीत झाले. असे अनेक हिंसकप्रकार होतील आणि सरकारही कडक पाऊले उचलेलं याची गांधींना जाणीव होती.
सर्वसामान्य जन हे अत्याचार सहन करणार नाहीत. त्यांना हालअपेष्टा सहन करणे शक्य नाही.( जालीयन वाला बागेचा काळा इतिहास पार्श्वभूमीला होताचं )चळवळींचा अनुभव नसलेली माणसे सरकारी अत्याचारामुळे खचतील, पुन्हा कदाचित उभारी घेणार नाहीत.
हे जाणून ही चळवळ गांधीनी. माघारी घेतली.
..आणि जरी गांधींच्या अहिंसक लढ्यावरील लोकांचा विश्वास जरी कमी झाला. सर्वसामान्य लोकांची सत्याग्रह बद्दलची धारणा बदलली असली, गांधींच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडण्याची मनीषा त्यांच्या मनी दाटलेली असली...तरीसुद्धा या आंदोलनाने भारतातील जनतेचे अभूतपूर्व असं आंदोलन उभे राहिले .या आंदोलनामुळे ब्रिटिशांविरुद्ध भारतभर जनता उभी राहिली. ब्रिटिशांविरुद्ध व्यापक क्षेत्रातील,कानाकोपऱ्यातील लाखो लोक या आंदोलनात सामील करण्यामध्ये या चळवळीला यश मिळालं. फक्त शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील जनतेने उस्फूर्तपणे या चळवळीत भाग घेतला.
आपणही राष्ट्रीय चळवळीत भाग घेऊ शकतो. राष्ट्रीय लढ्याचे भाग होऊ शकतो ,ही जाणीव लोकात निर्माण झाली. त्यांच्यामध्ये राजकीय जागृती झाली देशाच्या कामाबद्दल आस्था वाढली सार्वजनिक कामाबद्दल उत्साह वाढला राष्ट्रीय चळवळीपासून कोसो दूर असलेले अनेक समाजघटक एकाच मार्गावर येऊन लढू लागले. सामान्य जनता राष्ट्रवादाच्या ध्येयाने भारुन गेली. चळवळीत सामील झालेल्या लोकांच्या मनातील शासनाची भीती, दडपशाहीची दडपण, शिक्षेची धास्ती नाहीशी झाली.
आपल्या देशाच्या हितासाठी वाट्टेल ती किंमत मोजणे, हाल अपेष्टा सहन करणे, तुरुंगवास सोसने , रस्त्यावर उतरणे यासारख्या गोष्टी करणे त्यांना अभिमानाची वाटू लागले.
नेते गांधीजी, चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस, मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू इत्यादींनी आपल्या कामामुळे लोकांच्या पुढे आदर्श ठेवले. या आदर्शपासून काही वेगळ्या प्रेरणा घेऊन लोक या जनआंदोलनात सहभागी झाले. चळवळ मागे घेतल्यामुळे लोकांचा हिरमोड झाला पण लोकांना या प्रकारे एकत्र आणता येते.त्यांचा दडपलेला आत्मविश्वास जागृत करून लोकांना एकत्र आणता येतं, हे या चळवळीने सिद्ध केलं असं. या चळवळीमुळे काँग्रेसच्या कार्यातही, कार्यनितीतही अनेक बदल झाले. काही शिक्षित लोक एकत्र येऊन चर्चा करतात वा काही मर्यादित भागाचे , विषयाचे मुद्दे उचलत आहेत हे काँग्रेसचे रूप बदलून गेले.
गांधींच्या रुपाने राष्ट्रीय चळवळीला एक क्रांतिकारक स्वरूप मिळाले. केवळ अर्ज देण्यापुरता हा पक्ष राहिला नाही ,तर लोकांसाठी सक्रिय काम करून प्रसंगी रस्त्यावर उतरायला ही संघटना तयार झाली .अहिंसा , सत्याग्रह ही अस्त्रे राष्ट्रीय चळवळीला, सर्वसामान्य लोकांना मिळाली. अर्थातच ही किमया महात्मा गांधीजींच्या असामान्य नेतृत्वाची आहे. हे सर्वांनी अगदी गांधीजींच्या त्यावेळच्या विरोधी मतांनी सुद्धा मान्य केले आहे .जनसामान्यावरील , सामान्यावरील प्रभाव नेत्यांनी सुद्धा अनुभवला .गांधीजींच्या बद्दल अनेकांचा विश्वास दृढ झाला.
भारतासारख्या अखंड प्रचंड मोठ्या देशाला, विविध विचारसरणी आणि सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या लोकांसाठी चालवल्या चळवळीत गांधीजीनी जी नैतिक मूल्ये दिली त्याचा औचित्य मोठ्या नेत्यांना आणि सामान्य जनतेलाही कळाले.
अखिल भारतीय नेते म्हणून गांधीजी प्रस्थापित झालेच आणि त्यांचा असहकाराचा अभिनव मार्ग हर लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचला.
म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments
Post a Comment