Ratan Tata रतन टाटा

👁️🌴👁️
*वाचावे आनंदे !*

*देश का रतन*

देश संकटात असताना अनेक देशभक्तांनी देशाला नेहमीच मदत केली आहे. उलट संकटकाळातच सज्जन शक्ती उजळून निघाली आहे.

कोरोना वायरसवरती मात करण्यासाठी लागणा-या मेडिकल साहित्य खरेदीसाठी टाटा ट्रस्टतर्फे 500 करोड रूपयांची मदत जाहीर झाली. त्यानंतर पुनः टाटा सन्स कडून पंतप्रधान रिलीफ फंड ला 1000कोटी रूपयांची मदत जाहीर झाली.

धन्यवादाचे एकच सूर देशभर उमटू लागले.


...टाटा उद्योग समूहाला  दीडशे वर्षाची परंपरा आहे. नौशेरवानजी टाटा हे टाटा उद्योगसमूहाचे आद्य संस्थापक होत ! जमशेदजी टाटा यांनी आपल्या कर्तृत्वाने टाटा उद्योगाचे नाव उज्वल केले. सर दोराबजी टाटा ,जे.आर डी टाटा या श्रेयनामावली आणखी दोन महत्त्वाची नावे  !त्यानंतर रतन टाटा यांच्याकडे टाटा उद्योग साम्राज्याची धुरा आली.

रतन टाटा यांचा जन्म मुंबई येथे 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. 1962 मध्ये त्यांनी टाटा उद्योग समूह प्रवेश केला.

उद्योग समूहाची जबाबदारी सांभाळताना व इतर अनेक पदे , जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. गुंतवणुक आयोग ,भारत सरकारचे ते अध्यक्ष होते. पंतप्रधानांचे व्यापार व उद्योग मंडळ, राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा मंडळ, गुंतवणूक मंडळ दक्षिण आफ्रिका सरकार, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कम्पिटिटिव्हनेस  कौन्सिल इत्यादी मंडळाचे ते सदस्य होते .ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार मंडळाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सिंगापूर आर्थिक विकास मंडळाची आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती ,न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज संचालक मंडळ सल्लागार समिती,
मित्सुबिशी कार्पोरेशनची आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती इत्यादी विविध समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूरचे ही तेअध्यक्ष होते .

या त्यांच्या उत्तुंग कामाला सलाम म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले.2000 झाली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण हा बहुमान दिला.
२००३ मध्ये  विश्वविख्यात *अर्नेस्ट अॅण्ड याँग आंत्राप्रिन्युअर ऑफ द इयर* हा अत्यंत मोलाचा पुरस्कार.
*२००८- नॅसकॉम ग्लोबल लीडरशीप अॅवार्ड* पुरस्काराने ते सन्मानीत झाले.*** 2007 मध्ये जगाच्या व्यापार उद्योग क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली पंचवीस उद्योजकांच्या यादीत रतन टाटा यांचा समावेश झाला.

  2003 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले. युकेटीआय इंडिया बिझनेस अॅवार्ड त्यांना 2007 त्यांना प्राप्त झाले. 26 जानेवारी 2008 रोजी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला.  2008 च्या टाईम मॅगझिनच्या जगातील सर्वात प्रभावी शंभर व्यक्तींच्या यादीत त्यांचा समावेश केला.

 या आणि अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे.
🌟🌟🌟

अशा प्रकारचे उत्तुंग,अनमोल दान देण्यासाठी देशाच्या संकटांमध्ये धावून जाण्याची वृत्ती ही टाटा साठी नवीन नाही .टाटा समूह आणि त्यांच्या व्यवस्थापकांनी हे वेळोवेळी दाखवून दिले आहे.

कर्तृत्व मोठे आहे, नवकोट श्रीमंती आहे, ...आणि दानत नाही तर ?... अशी काही उदाहरणे आहेतचकी !

.. रतन टाटा यांचे उदा. मात्र वेगळे ! आपण देशाचं काहीतरी देणे लागतो, आपण समाजाचे काही देणे लागतो अशा प्रकारची भावना ज्यांच्या मनात अखंड रुजली आहे ,तीच माणसे अशी भव्यदिव्य काम करू शकतात.
रतन टाटा त्या नामावलीतील एक ठळक नाव होऊन राहीले आहे.
(क्रमशः )
संदर्भ - रतन टाटा . सुधीर सेवेकर,
🇮🇳🌟🌸🌿☘🍂🍃🍀🌿☘
यमाई औंध,राजेंद्र गुरव

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510