डॉ बाबासाहेब आंबेडकर

अभिवादन
👁️🌴👁️
*वाचावे आनंदे*

*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर*

 डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात ज्ञानसूर्य, आजन्म ज्ञानलालसेने ज्ञानसाधना करणारा आणि भविष्याचा वेध घेत वर्तमानात अखंड लढणारा नेता !
 दलित ,वंचित, पीडीत वर्गासाठी  झगडणारा त्यांच्या उन्नयनासाठी अखंड  चिंतन करणारा व त्या ध्येयासाठी आपलं जीवन खर्च करणारा योद्धा   विचारवंत  म्हणजे बाबासाहेब !

डॉ.आंबेडकरांनी आपल्या निस्वार्थ त्यागाच्या आणि समर्पणाच्या भूमिकेतून दलित वर्गाच्या उद्धाराची जी आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत भलावण केली ती अवघ्या मानवतेच्या भल्याची ठरली आहे. या विशेष अर्थाने वर्ण व्यवस्थेमुळे पिचत पडलेल्या लोकांसाठी ते देवदूत ठरले आहेत.

अखंड नंदादीपासारखे तेवत राहणे, प्रकाशीत रहाणे व अनेकांचे जीवन उजळून टाकणे हे डॉक्टरांचे महद कार्य.
डॉक्टर ना शिक्षणाचे महत्व समजले होतेच. शिका त्यांचा पहिला मंत्र ! *शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे.ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही* असे ते म्हणत.
स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर  शिक्षणक्षेत्रात सर्वोत्तम ठसा उठवला आहे. त्यांच्या पदव्या त्यांच्या विद्येचे द्योतक आहेत .बी.ए.,एम .ए., पी एच. डी., एम एस्सी, डी एस्सी ,बार ॲट लॉ आपल्या महान कर्तृत्वामुळे गुणसंपन्न या एकापेक्षा एक सरस पदव्यांमुळे व तशाच दर्जाच्या कार्याने ते महामानव ठरले आहेत.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथून कोलंबिया विद्यापीठाची एम ए,पी एच डी ही सन्माननीय पदवी,एम.एस्सी,डी एस्सी लंडन विद्यापीठातून मिळविली आहे. तर हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाची डिलीट ही मानाची पदवी मिळवली. पुढे त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारत वर्षातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांना गौरवले.

    वर्ण वर्चस्वाच्या व हलाखीच्या परिस्थितीतआपल्या असीम धैर्याने व अतुल शौर्याने जन्मता प्राप्त परिस्थितीवर मात करून  त्यांनी हे मिळविले  व पुढे हे संचित  मानवतेच्या कल्याणासाठी व देशहितासाठी अखंड वापरले. असे सत्कार्य करणारा  बाबासाहेबांसारखा नेता विरळाच !
 महाडचा चवदार तळयावरील सत्याग्रहासारखी सामाजिक कार्ये, बहिष्कृत भारत चे संपादक म्हणून त्यांनी केलेले कार्य, नेहरू कमिटीची छाननी आणि गोलमेज परिषदेमध्ये सहभाग हे त्यांच्या जीवनकार्यातील महत्त्वाचे टप्पे ठरावेत.
 एक लोकशाही प्रेमी, धर्मप्रेमी ,ज्ञानार्थी आणि स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची इतिहास नोंद  लिहून घेत राहीलच, त्याचबरोबर
  स्वातंत्र्यापूर्वीच्या मंत्रिमंडळामध्ये त्याने मजूर खात्याचे मंत्रीपद भूषविले होते , त्याचप्रमाणे बांधकाम खात्याची ही धुरा सांभाळली होती. तर स्वतंत्र भारताच्या पंडित नेहरू मंत्रिमंडळामध्ये त्यांनी केंद्रीय विधी खात्याचे कायदामंत्री हे पद भूषवले होते. स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य वादातीत आहे. भारताला मिळाल्या अनमोल राज्यघटनेमध्ये मसुदा समितीचे महत्त्वपूर्ण काम आंबेडकरांनी सार्थपणे पार पाडले  आहे.स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय व परराष्ट्र धोरण ठरवताना व भारतातील अस्पृश्य सुधारक समाजसेवेचे कार्य यामध्येही डॉक्टरांच्या अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचा नेहमीच हातभार लागला आहे.
सामाजिक,राजकीय कामाबरोबर त्यांचे प्रचंड ग्रंथ लेखनाचे कार्य हे डॉक्टरांच्या महान कर्तृत्वाचं आणखीन एक देणे !

 ज्ञानलालसा ,त्यासाठी अविश्रांत परिश्रम आणि मिळालेल्या ज्ञानातून भविष्याचा अचूक वेध घेणारी दूरदृष्टी आणि राष्ट्रभक्ती व जनहितकारी कार्य यासाठी डॉ.बाबासाहेब हे नाव भारत वर्षाच्या नेहमी स्मरणात राहील.

जय भीम ! जय हिंद !
🇮🇳🌟🌿☘🍀🍃🍂🕉🌸
@राजेंद्र गुरव,यमाई औंध

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510