आभाळच फाटलयं... !

आभाळच फाटलंय
कुठं कसं ठिगाळ लावू
 दोन्ही टोके  संसाराची
एकटी कशी  सांधू ?

 आवक नाही ,बॅलेन्स नाही
कशीतरी जूळवणूक
संसार टिकावा परमेशा
हिच एक भाकणूक ॥

 कसे गेले कोठे गेले
सौख्याचे गोड दिन ?
संसाराचा गोड ओढीत होते
धनीसह पहाड फोडत होते ॥
नियतीने केला कावा
टिपले सावज नकळत
संसाराचा गाडा हाकते आहे
उन्हात जळत होलपडत I

 नियतीचा तराजू
कसा बाई आवरु ?
तुफान शिरलयं नशीबी
कसा संसार सावरू ?

 अवचित मध्यावरी..
सोडली धन्याने साथ
झुंजते काळाशी एकाकी
करीन दैन्यावरी मात ॥


 यमाई औंध,राजेंद्र गुरव

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510