लक्ष्मण रेषा
👁🌴👁
*वाचावे आनंदे!*
यमाई औंध राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
*लक्ष्मण रेषा*
प्रत्येकाची जशी शक्तीस्थाने असतात तशा असतात उणिवा...,
असतात मर्यादाही !
माणसाने एखादे क्षेत्रात खूप मेहनत घेतलेलेली असते. ते क्षेत्र त्याचे बलस्थान ठरत जाते.
तसे प्रत्येकाची एक मर्यादाही राहून जाते. ....आपल्या बुद्धीची,देहाच्या बलाची, सामर्थ्याची, विचारांची एक मर्यादा आहे.
प्रत्येकाची क्षमता वेगळी तशी प्रत्येकाची मर्यादा वेगवेगऴी आहे.
'व्यक्ती तितक्या प्रकृती ' जगात आढऴतात आणि त्या त्या मर्यादांवरून माणसाचे कार्यक्षेत्र ठरत असते.
एखादा शेती करेल, एखादा समाजकारणात जाईल,एखादा उद्योग करेल,एखादा नोकरी करेल,तर एखादा हमाली करेल. म्हणून कोणतेही कार्य करताना माणसाने आपल्या बुद्धीच्या ,सामर्थ्याच्या,, मर्यादेचा विचार केलाच पाहिजे.
क्षमता नसताना एखादे कार्य हे प्रचंड कष्ट, मनस्ताप, वेळेचा अपव्यय देण्याची शक्यता जास्त !
एखादे रबर किती ताणावे ?... त्याची मर्यादा पाहून ... नाहीतर तुटून जाईल ते !.
माणसाला स्व जाणीव झाली की माणूस स्वतःच्या सामर्थ्य , मर्यादांच्या विचारात राहील.
,
' हे तुझे काम नाही ! ' असा एखादा नकारात्मक विचार असेल कदाचित ...
पण तोच विचार , आपण यासाठी आणखी प्रयत्न ,तयारी करावी लागेल हे सांगून जाईल.
आपण आपली मर्यादा ओऴखावी. ' एखाद्याला हे पटते,तर एखाद्याला पटत नाही !
काही शहाण्यांचं ( ? ) थोडे वेगऴे आहे.जणू काही हर क्षेत्रांत आपला अधिकार थोर आहे असे समजून तो वागतो. प्रत्येक विषयावर प्रतिक्रिया देत राहतो. आपल्या मर्यादांचा तो फार क्वचितच विचार करतो. दुस-याच्या क्षेत्रात सहजपणे प्रवेश करून सल्ला देण्याचे आपले काम तो चालूच ठेवतो
... आणि तो कदाचित उंटावरचा शहाणा ठरतो.
हे सारं पुन्हा आठवायचं कारण, म्हणजे काही व्हाट्सअप बहाद् दर, आपण कोरोना क्षेत्रातील तज्ञ आहोत, शास्त्रज्ञ आहोत या अविर्भावात सटासट पोस्ट टाकीत होते.... पोस्टचा गदारोळ एवढा की सामान्य वाचक गोंधळून जायचा ! शेवटी शासनाला हस्तक्षेप करून हे थांबवावे लागले. कायदयाचा बडगा दाखवावा लागला. तेंव्हा कुठे लेखण्या ? ( कॉपी आणि पेस्ट ) बहाद्दर थंड पडले.
त्यांचे धडाधड सल्ले देत सुटने बंद झाले आणि अनेक बापुडेजण यातून सुटले आहेत.
आता शासनाने त्यांनाही मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यामुळे काही ग्रुपनी only admin send messages settings च्या मर्यादा स्वीकारल्या आहेत.
शासनाच्या संचारबंदी व संसर्गरोग संदर्भाने असलेल्या आदेशांचे . पालन करूया.घराच्या कुंपण आतच रहावे आणि सुरक्षित राहवे.
ही लक्ष्मणरेषा, मर्यादा सर्वांनी पाळूया ! सर्वांचे आरोग्य आणि जीवित संरक्षित करूया
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव

Comments
Post a Comment