यमाई देवी औंध, आरती
नवरात्र द्वितीया ,३रा दिन ३/१o I१६ 👁🌴👁 *IIवाचलेल्याअन *कुठतरी साचलेल्या कविता*॥* राजेंद्र गुरव,यमाई औंध *!!श्री मूळपीठ यमाईची आरती ॥* जगदंबे मूळपीठ निवासिने - आरती तुज अंबे I यमाईमाते, औंधासूरमर्दिने - आरती तुज अंबे सुहास्य चंद्रमा ल्याली, भस्म विलेपन भाली शिवशंभूची अर्धांगी माऊली ,आरती तुज अंबे_1 त्रिशुल, डमरु हाती, जटाभार शोभे माथी ऊँ 'काराचा घोष तुझ्या अंतरी,आरती तुज अंबे - 2 वजर्टीक भाळली कंठी , रुद्रमाळ रुळे वक्षी जगनमाऊली तेजस्वी तपस्वीनी, आरती तुज अंबे- 3 मांगल्यमूर्ती शिवे, मयूरवाहिनी अंबे औंधासूराला मारिले तू बळें,आरती तुज अंबे --4 सगुण - निर्गुण रुपे , शक्तीची प्रतिबिंबे कृष्णनंदनास्तव ह्रदयी विराजींते,आरती तुज अंबे ॥ *कृष्णनंदन* ॥ भावार्थ - *जगदंबे मूळपीठ निवासिने - आरती तुज अंबे I* *यमाईमाते, औंधासूरमर्दिने - आरती तुज अंबे* श्री. मूळपीठनिवासिनी श्री यमाई हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान.. अनेकांचे कुलदैवत ही ! त्या देवीची स्तुती करत...
Comments
Post a Comment