भूपाळी

जय जगदंबे अंबा बाई ,तूच आम्हां माउली
शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली
--अमृतयोगे तुझ्या रुपाची,प्रगटती प्रतिबिंबे
आशीषाची सुवर्णपुप्षे ,सुगंधिती जीवने
तुझ्या कृपेची गंगा वाहे ,सदा या राउळी     
शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली - // १ //
मातृत्वाची लेणी भरली ,तुझीया हृदय कमली
दातृत्वाचे देणे देते ,सुखाची अंजली
तुझ्या दर्शनी भेटतो माते ,स्वर्ग या मंदिरी
शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली -२
पराक्रमाची विराट रूपे ,वधति दानवा ते
तपस्विनी ची सौम्य रूपे .दिसति नाम स्मरणे
तुझा महिमा किती गाऊ ,थिटी इथ जीवनी
 शिवानंदे सतत राहू दे ,आम्हां वरी साउली
 -- कवी - राजेंद्र बाळकृष्ण गुरव २४. १९९७ नाताळ
यमाई मंदिर ,देवी आराधना -या पुस्तकातून
rajendra Gurav

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510