वेळोवेळी सर्वस्व अर्पणारा नेता

वेळोवेळी सर्वस्व पणाला...
🌸🍃🌺🍂☘🌿🌸

म गांधी यांनी तन- मन अर्पून अथक देशसेवा केली.उच्चशिक्षीत आणि लोकांचे अनिभिष्टीत राजांकडे स्वतःचे म्हणून धन ते नव्हतेच .

१९२० चे दरम्यान म गांधींच्या सर्वव्यापी भूमीकेमूळे हिंदू - मुस्लिम ऐक्य दिसून आले होते. असहकार चळवळ मध्ये दोन्ही समाज सामील झाले होते ,आणि चळवळ स्थगित झाल्यानंतर ही ऐक्य लुप्त झाले.

नुसते ऐकय कमी झाले नाहीतर, देशात निराळ्या ठिकाणी गंभीर व हिंसक दंगली झाल्या. 1924 मध्ये हिंदू-मुस्लीम चळवळीला दंगलीला ऊत आला होता.
ब्रिटीशांची भूमिका बघ्याची होती. वायव्य सरहद्द प्रांत प्रांतातील कोहत येथे झालेल्या दंगली अतिशय क्रूर होत्या, उग्र होत्या .अनेक हिंदू मारले गेले होते.

 या दंग्याची चौकशी करण्यासाठी गांधीजी प्रत्यक्ष त्या भागात फिरले .अनेकांच्या भेटी ,अनेकांचे अश्रू पुसले ,अनेकांचे सांत्वन... भडकलेली माथी शांत करण्याचा प्रयत्न. सामान्यांत शांतता रहावी म्हणून प्रयत्न....
हिंदू - मुस्लीम नेत्यांतील सुसंवादासाठी प्रयत्न.
...या दंग्यांच्या निषेधार्थ गांधीनी दिल्लीला 21 दिवसाचे उपोषण केले. यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची एकी झाली. सर्वपक्षीय परिषदेने दंगली थांबविण्याचे आव्हान केले.या केलेल्या आव्हानामुळे त्याकाळच्या दंगली थांबल्या .
 संकटसमयी महात्मा  धावून गेला,नेत्यांनी संकटाला कसे सामोरे जायचे असते याचा वस्तूपाठ गांधीजींनी दिला.
इतिहास साक्ष आहे पुढे आपल्या कृतीने हे  त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
 गांधीजींचा सर्वधर्माचे लोकांवर असलेला प्रभाव  यातून दिसून येतोच, आणि एखाद्या प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्व लावण्याचा, आपले प्राण तोशिष  लावण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांचे ह्रदयास भिडतो.

म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510