मुत्सद्दी गांधी
आयर्विन आणि मुत्सद्दी म गांधी
🌸🍃🌺🍂🌿🍃🌸
गांधींनी आयर्विनला पत्र लिहिले आणि त्यामध्ये मागण्या केल्या.
पूर्ण मदय(दारू )बंदी केली जावी. जमिनीच्या महसुलात पन्नास टक्के कपात केली जावी.
परदेशी कापडावर आयात कर लावला जावा. भारतीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी असावी. राजकीय बंद्यांची मुक्तता केली जावी. या प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश होता.
*या मागण्या सरकारने पूर्ण केल्या तर चळवळीचा संकल्प सोडून देऊ अशी तयारी गांधींनी दाखवली होती*
देश राष्ट्रव्यापी चळवळीच्या उंबरठ्यावर आहे ,काँग्रेस संघटना चळवळीसाठी तयार आहे ,उत्सुक आहे आणि अश्या वेळी गांधीजी थोड्या मागण्या करून , चळवळ रद्द करण्याचा मानस व्यक्त करतात हे काहींना अविश्वसनीय वाटत होतं, तर्कसंगत वाटत नव्हतं,विसंगत वाटत होतं.
गांधीजींच्या एकूण जाणिवेची, त्यांच्या राजकीय तंत्राची ज्यांना ओळख नव्हती त्यांना असं नेहमीच वाटत आलं असतं.
पण गांधीजींच्या मागण्या सकृतदर्शनी दिसायला सामान्य वाटत असल्या तरी सरकारने त्या मान्य करणे शक्य नव्हतं. *कारण सरकारचा प्रचंड महसूल बुडत होता, त्यांच्या अमाप उत्पन्नाला धक्का बसणार होता. गांधीजीनी अगदी विचारपूर्वक या मागण्या केल्या होत्या. सरकारने त्या मागण्या मान्य नाही केल्या की लगेच जनतेच्या साध्यासाध्या मागण्यासुद्धा सरकार मान्य करत नाहीत असं म्हणत प्रचार करायला गांधीना मोकळीक होती आणि सामान्य जनतेला सरकारप्रती चेतवायला, त्यांच्या संतापात भर टाकायला गांधीजींच्या अशा योजना नेहमीच यशस्वी ठरल्या आहेत.*
*गांधीजी एका ठिकाणी म्हणतात माझ्याविषयी विसंगत वर्तणूकी मागे निश्चित पद्धती ठरलेल्या आहेत* गांधीजींचे स्वतःच्या नियोजनावर एवढा विश्वास होता की ऐनवेळी येणाऱ्यामुद्द्याकडे, अल्पमती सूचनामुळे , गांधीजींनी मूळ नियोजनात फरक करण्याची गरज पडली नाही .
गांधीजींच्या अपेक्षेप्रमाणे सरकारकडून नकारात्मक प्रतिसाद आला. गांधीजींनी तातडीने साबरमती आश्रमात काँग्रेस कार्यकारणीची बैठक घेतली. त्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करायची आणि त्याची सुरुवात महात्मा गांधींनी करायची असा निर्णय घेण्यात आला. आणि ही चळवळ केवळ काँग्रेसची नव्हे तर संपूर्ण जनतेची असावी, नेत्यांना अटक झाली तर सामान्य जनतेने आंदोलन चालू ठेवावे, चळवळीच्या दरम्यान लोकांनी सरकार बरोबर असहकार पुकारावा. सत्याग्रहाला सर्वांनी मदत करावी. सर्वसामान्य मार्गाने चळवळ चालवावी, कदाचित एखादी हिंसक घटना घडली तर 1922 प्रमाणे चळवळ मागे घेतली जाणार नाही याचे गांधीजीनी आश्वासन दिले .
*गांधी आपल्या यंग इंडिया पत्रातून आपल्या मुद्द्यांची प्रचार करत होतेच. लाखो लोकांचा अभिसरण लाभलेली ही गांधीजींची वर्तमानपत्रे ,गांधींची मतपत्र होती .गांधींची सगळी योजना मत लोकांच्या पर्यंत पोहोचत होती. सायंकाळच्या प्रार्थनेतून, सभेतून गांधीजी लोकांची चळवळीसाठी मानसिक तयारी करत होते. चळवळ विषयी आपले विचार लोकांना उलगडून दाखवत होते.*
ही चळवळ यशस्वी होण्यासाठी लोकांनी कसं वागलं पाहिजे याची शिकवण देत होते.
ब्रिटिश शासनापासून मुक्त होणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी काम करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे ,हे ते लोकांना वारंवार बजावून सांगत. सविनय कायदेभंगाची राष्ट्रीय आंदोलनाची ते पार्श्वभूमी तयार करत होते.
म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments
Post a Comment