सत्याग्रही गांधी

सत्याग्रह आणि गांधी
🌸🍃🌺🍂☘🍃🌸

सत्य म्हणजे गांधींचा जीव की प्राण गांधीजींनी आपल्या आयुष्यभर त्याचं अनुकरण केलं.

 अहिंसेबरोबर गांधीजींच्या तत्वज्ञानाचा दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रह.
गांधींजींनी आपले सार्वजनिक जीवनात सत्याग्रहाचा शस्त्रांप्रमाणे वापर केला. जे -जे म्हणून वाईट आहे, अनिष्ट आहे , अन्यायकारक आहे,असत्य आहे.त्याच्याविरुद्ध उभे राहणे म्हणजे सत्याग्रह.

 त्यासाठी सत्याग्रही तयारीचा हवा.त्याने  प्रेम, आत्मक्‍लेश आणि आत्मसिद्धी या मार्गाने प्रतिस्पर्धीच्या  चांगल्या भावनेला साद घालने आवश्यक आहे. त्याने प्रेमशक्तीने त्याचे  दैवी अंशाला अहवान  देणे आणि त्याच्याविरुद्ध ,त्याच्या वाईटविरुद्ध लढा देण्याचे तंत्र म्हणजे सत्याग्रह.
 गांधी त्याला प्रेमाचे सामर्थ्य किंवा आत्मशक्ती म्हणत. बळाचा वापर न करता अन्यायाविरुद्ध लढण्याचे, शूरांनी वापरण्याची ते सर्वात बलशाली शस्त्र आहे असे गांधी म्हणत.

 *जर सत्य साध्य आहे तर अहिंसा हे साधन  आहे*
माणसातील दृष्टतेचा प्रतिकार करताना, जुलमी सत्तेचे हृदयपरिवर्तन प्रेमाने करण्याचा प्रयत्न सत्याग्रही  करतो . तंटा किंवा संघर्ष कोणत्याही प्रकारचा असो त्याचे निराकरण सत्याग्रहाच्या मार्गाने होऊ शकते असा गांधींचा विश्‍वास होता.

म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510