गांधी म्हणजे

*गांधी म्हणजे...*
🌸🍃🌺🍂🌿🍃🌸

*गांधी म्हणजे नुसता प्रतिसाद नाही, गांधी म्हणजे प्रक्रिया आहे.*

 एका दिवसात लावलेले ते धडामधूम लग्न नाही
  सर्व बाजू संभाळीत, केलेला संसार आहे .

गांधी म्हणजे संकरित पावडर लावून पिकवलेला आंबा नाही...
 मोहरापासून झाडावर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आहे

गांधी म्हणजे आगडोंब नाही तर चेतवली जाणारी अग्नी आहे.

गांधी म्हणजे लखलखीत वीज नाही, तर धगधगती मशाल आहे.

गांधी म्हणजे क्षणातली क्रांती नाही, तर युगायुगाची उत्क्रांती आहे

गांधी म्हणजे नुसते रसपान नाही ,तर समरस होणे आहे

 गांधी म्हणजे नुसता शब्दजाल नाही तर प्रेम आलाप आहे

गांधी म्हणजे नुसती कृती नाही ,तर कृती कार्यक्रम आहे.

गांधी म्हणजे नुसता डामडौल नाही, तर सत्याचा कौल आहे.

गांधी म्हणजे फुकाचे शब्द नाहीत,
कृतीडोलारा सांभाळणारी सबलकृती आहे.

गांधी म्हणजे नुसता विचारजन्म नाही, तर सांगोपांग संवर्धन आहे.

गांधी म्हणजे अवचित झालेला बदल नाही ,परत जाणून-बुजून केलेली व्यवस्था आहे.

म गांधी १५० वी जयंती वर्ष निमित्त
🌸🌿☘🍀🍂🍃🌺
राजेंद्र गुरव, यमाई औंध,९५६११५४१४० मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.com
🌹🕉🇮🇳🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510