लोकांचा राजा The king of People

*लोकांचा राजा.*
🌸🌿☘🍁🍀

म गांधी हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. लोकांत मिसळणारे.लोकांना जाणणारे. लोकांसाठी काम करणारे.

ते सर्व जनता आपली मानत आणि सर्व जनता त्यांना आपली मानात.
किती जिव्हाळा होता जनतेचा आपल्या बापूंवर, गांधीबाबांवर, महात्म्यांवर... !

गांधींच्या एका हाकेवर करोडो लोक रस्त्यावर येत... गांधींसाठी कोणताही त्याग करणेस तयार होत.

नेताजी सुभाषचंद्र बोस गांधींचे अनुयायी, सहकारी ! त्यांची  बापूंबद्दल एक आठवण...

***** *मार्च १९३१ च्या दुसऱ्या आठवड्यात गांधीजी मुंबईहून दिल्लीला गेले. सुभाषबाबू (बोस) त्यांच्याबरोबर होते. प्रवासामध्ये दोघांचे बरेच बोलणे झाले. गाडी स्टेशनवर थांबली की लोक गांधीदर्शनासाठी मोठी गर्दी करीत. गांधीजींचा जयजयकार करीत होते, त्यांच्या दर्शनासाठी धडपडत होते, गांधीजींच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी वाकत होते. हे सर्व नेताजी जवळून पाहत होते.
सुभाषबाबू म्हणाले, *"या युगातला लोकांचा राजा पाहायचा असेल तर गांधीजींकडेच पाहायला हवं* - *राज्य नसलेला, राजवाडा नसलेला राजा, केवळ खादीच्या पंच्यात आणि उपरण्यात वावरणारा उघडावाघडा राजा. हातातली सडसडीत काठी हाच त्या राजाचा राजदंड"*

**गांधी म्हणजे लोकांचे लोकांसाठी झिजणारे,सामान्य लोकांतून उगविलेले नेते*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510