लुई फिशर यांना गांधीजींनी १७ आणि १८ जुलैला मुलाखत दिली होती. त्यातील समाजवाद आणि साम्यवाद यासंबंधी गांधीजींनी व्यक्त केलेल्या मताचा भाग इथे उद्धृत करत आहे -
आमच्या समाजवादी मित्रांच्या त्यागाचे आणि आत्मसंयमाचे मला कौतुक वाटत असले तरी त्यांच्या पद्धतीत आणि माझ्या पद्धतीतील अंतर मी कधीही लपवलेले नाही. त्यांचा हिंसेवर आणि तिच्याशी संबंधित गोष्टींवर विश्वास आहे तर माझ्याकरिता अहिंसाच सर्व काही आहे..
लुई फिशर - तुम्ही जसे समाजवादी आहा तसेच तेही आहेत.
गांधीजी - मी आहे, ते नाहीत. त्यांच्यापैकी अनेकांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी समाजवादी होतो. मी समाजवादी असल्याबद्दलची जोहानिसबर्गमधील एका कट्टर समाजवाद्याची मी खात्री पटवून दिली होती. परंतु हे सागून काहीही फायदा नाही. त्यांच्या समाजवादाचा मृत्यू झाल्यानंतरही माझा हा दावा कायम राहील.
लुई फिशर - तुमच्या समाजवादाचा अर्थ काय?
गांधीजी - माझ्या समाजवादाचा अर्थ आहे ‘सर्वोदय’. मूक, बधीर, आंधळे अशांच्या राखेवर मला वर चढायचे नाही. त्यांच्या समाजवादात यांना बहुधा स्थान नाही. त्यांचा एकमेव उद्देश भौतिक प्रगती आहे. उदाहरणार्थ अमेरिकेला प्रत्येकाला मोटरगाडी द्यायची आहे. माझी तशी इच्छा नाही. माझ्या व्यक्तिमत्वाची पूर्ण अभिव्यक्ती करता येईल असे स्वातंत्र्य मला हवे आहे. व्याधाच्या ताऱ्यापर्यंत मला शिडी बांधण्याचा अधिकार असला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की मला असे काही करायचे आहे. इतरांच्या समाजवादात व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही. त्यात तुमचे स्वतःचे काहीही नसते, तुमचे शरीरसुद्धा.
लुई फिशर - होय, परंतु समाजवादातही अनेक प्रकार आहेत. सुधारित स्वरूपातील माझ्या समाजवादात प्रत्येक गोष्ट राज्याच्या मालकीची नसेल. परंतु रशियात मात्र असेच आहे. तिथे तुमच्या शरीरावरसुद्धा अधिकार नसतो. तुम्ही कोणताही अपराध केलेला नसला तरी तुम्हाला केव्हाही अटक करता येऊ शकते. त्यांची इच्छा असेल तिथे ते तुम्हाला पाठवू शकतात.
तुमच्या समाजवादात मुलांवर राज्याचा मालकी हक्क नसतो काय व राज्याला हवे तसे ते त्याला प्रशिक्षण देऊ शकत नाही काय?
गांधीजी - सर्वच राज्य तसे करतात. अमेरिकाही असे करते.
लुई फिशर - अमेरिका रशियापेक्षा फारशी वेगळी नाही.
गांधीजी - परंतु असा समाजवाद एक तर हुकूमशाही होईल वा आरामखुर्चीतील तत्त्वज्ञान होईल. मी स्वतःला साम्यवादीसुद्धा म्हणवतो.
म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
(

Comments
Post a Comment