तो प्रसंग आणि गांधींचा निश्चय

*तो प्रसंग आणि गांधींचा निश्चय*
🌿☘🍀🌸🍁

अब्दुलाशेठनी गांधींना विचारले ' आपण एका दाव्याचे कामी प्रिटोरियाला जाता का ?
'दावा समजावून दिलात, तर मी सांगू शकेन '- गांधी

दाव्याचे मुद्दे ,शंका समजून घेऊन गांधी डरबनहून प्रिटोरियाला रवाना झाले. गांधीसाठी पहिल्या वर्गाचे तिकीट काढण्यात आले होते.

गांधींचा प्रवास सुरु झाला. गाडी नाताळची राजधानी मॅरित्सबर्ग येथे रात्री ९ वा पोहचली.

एक उतारु गांधीच्या डब्यात चढला. त्याने गांधीकडे पाहिले. हा कोणी गोरेतर येथे आहे?
काळ्या माणसास पाहून तो नाराज झाला.

तो डब्यातून बाहेर पडला. आणि अंमलदाराकडे गेला.दोन अंमलदार त्याचे सोबत घेऊन तो डब्यात माघारी आला.
भयाण शांतता... शेवटी एक अंमलदार पुढे आला व म्हणाला -
' " असे इकडे या, तुम्ही शेवटच्या डब्यात जावे . "
गांधी - " माझ्याजवळ पहिल्या वर्गाचे तिकीट आहे "
तो _ " त्याची चिंता नाही.मी सांगतो की, तुम्ही शेवटच्या डब्यात जावे. "
गांधी -" मीही सांगतो की,मी पुढील प्रवासाचे तिकीट काढले आहे.मला प्रवास पूर्ण करायचा आहे. '
तो -" ते काही चालायचे नाही.तुम्हांला उतरावेच लागेल. आणि उतरला नाही, तर शिपाई खाली काढेल. "
गांधी - " तर मग शिपायाला खुशाल काढू दया. *मी आपण होऊन नाही उतरणार*

गांधींजींनी बाणेदार उत्तर दिले. सर्व स्तब्ध झाले. प्रवासी अचंबीत आणि त्यांचे मनात विशीष्ट धाकधूक. त्या अंमलदारास हा अनुभव जरा वेगळा होता. त्याने शिपायास खुणविले.

शिपाई पुढे आला. त्याने गांधींचा हात पकडला आणि धक्का मारून त्यांना बाहेर काढले. सर्व सामान उतरून बाहेर ठेवले.

गांधींनी अर्थातच दुसऱ्या डब्यातून बाहेर जायचे नाकारले.

ट्रेन निघून गेली. गांधी वेटिंगरूम मध्ये शिरले. गांधींनी बाकी साहित्याला हात लावला नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ते साहित्य हलविले. '
ते थंडीचे दिवस होते. मॅरित्सबर्ग उंच भागामध्ये ,त्यामुळे खूप थंडी. इतर साहित्य, ओव्हरकोट साहित्यात. गांधी रात्रभर थंडीत कुडकुडत राहिले.

गांधी विचार करीत होते.
*माझे कर्तव्य काय आहे ? या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा? एक तर मी माझ्या हक्कासाठी झगडले पाहिजे. नाहीतर पुनः माघारी हिंदूस्थानात परतले पाहिजे.नाहीतर होतील ते अपमान सहन करुन दाव्याचे काम पूर्णत्वास नेले पाहिजे.दावा अर्धा टाकून जाणे हा नामर्दपणा होय.*
*गांधींनी विचार केला.हा झालेला प्रकार हा वरवर दिसणारा रोग आहे. पण याचे मूळ आहे स्वतःस उच्च  समजण्याची व दुसऱ्यास हिण मानन्याची वृत्ती.*
 *वर्णद्वेष...हा रोग मानवतेस लागलेली कीड आहे. हा दृढमूल रोग दूर केला पाहिजे.यासाठी लागतील ते कष्ट करणेस मी तयार आहे.जी पडतील ती दुःखे सहन करणेस मी तयार आहे. जी येतील ती संकटे झेलण्यास मी तयार आहे.*

म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510