एक अनुभव सत्तेचा

एक अनुभव सत्तेचा
🌿🍁🍀🌸☘

वकीली चालविण्याच्या दृष्टीने गांधींनी हातपाय हलविले. मुंबईला बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. पण ते निव्वळ चाचपडणे झाले.

मुंबईत खर्च वाचविण्यासाठी गांधी बहुधा चालत. ऊनात चालण्याजोगी सहनशक्ती त्यांनी कमावली. पण वकिली चालविण्यास असे यत्न थोडेच उपयुक्त ठरणार.

मग बंधूसह चर्चेअंती राजकोटला जायचे ठरले.

पोरबंदरच्या राणीसाहेबांचा मंत्री व सल्लागार होते गांधीचे बंधू.त्यांनी राणीसाहेबांना गैरसल्ला दिला असा आरोप त्यांच्यावर होता.

ती फिर्याद  पोरबंदरचा पोलिटिकल एजंट यांजकडे झाली. तो पो एजंट गांधींना इंग्लडमध्ये भेटलेला. थोडाफार परिचय.

बंधूना वाटले गांधींनी पो एजंटकडे शब्द टाकावा.
पण शिफारशीसाठी गांधी तयार नव्हते. त्यांनी रितसर अर्ज देण्याचा सल्ला दिला.

पण शेवटी आग्रहाखातर गांधी पो एजंटला भेटायला गेले.

बोलताना गांधींना जाणवले की इंग्लंडमध्ये सुट्टीसाठी आलेला पो एजंट व खूर्चीवर बसलेला एजंट यात फरक आहे.

गांधीजींच्या म्हणणे ऐकूनही न घेता त्या पो एजंट त्यांना  हाकलूनच दिले.

इतर वकिल मित्रांनी आपले कटू अनुभव सांगीतले व  सल्ला दिला.पो एजंटची गोष्ट विसरा .तो अपमान गिळून टाका.

गांधींनी तो कडू घोट पिला पण ते विसरू शकले नाहीत.




म.गांधी १५० व्या जयंती वर्षानिमित्त,🌸🌸🌸🌸
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४०,  8275370028
guravrajendra546@gmail.com🌺☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510