Mahatma Basaveshwara बसवेश्वर
👁🌴👁
*वाचावे आनंदे!* - ६
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
*अक्षय तृतीया २* _
क्रांतिकारक समाजसुधारक : बसवेश्वर.
(इ.स. ११०५ - इ. स. ११६७)
बसवेश्वर हे कर्नाटकातील संत व समाजसुधारक होते. त्यांनी वैदिक धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध व अन्य हानिकारक प्रथांविरुद्ध संघर्ष केला.
त्यांनी निर्गुण, निराकार एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला. बसवेश्वरांनी घालून दिलेल्या मार्गाला *लिंगायत धर्म* या नावाने ओळखले जाते.
लिंगायत पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची अक्षय्यतृतीयेला जयंती आहे. सर्वधर्मसमभाव जोपासणाऱ्या बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सर्व कनिष्ठ व उच्च जातीतील लोकांना लिंगायत समाजात प्रवेश दिला
स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, वारांगणांचे पुनर्वसन असे कार्य केले. सध्याच्या जातीधर्माच्या राजकारणात त्यांचे विचार समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत.
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्य़ातील बागेवाडी येथे बसवेश्वरांचा जन्म झाला. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा त्यांचा जन्मदिवस.
नंदीचे रुप म्हणून त्यांचे नाव वृषभ ठेवण्यात आले नंतर बसव व बसवेश्वर असे नामकरण झाले. बसवेश्वरांनी आठव्या वर्षी उपनयन (मुंज) करण्याचे नाकारले. घराचा त्याग केला. कुडलसंगम येथे जाऊन ते जातवेद मुनींकडे राहू लागले.
कर्नाटकात कृष्णा व मलप्रभा नद्यांच्या संगमावर हे शिवमंदीर होते. संगमेश्वरावर बसवेश्वरांची श्रद्धा होती. येथेच त्यांनी जातवेदमुनींकडून लिंगायत समाजाची दीक्षा घेतली. येथे वेदाभ्यास अनेक धार्मिक ग्रंथांचे अध्ययन, चिंतन, मनन बसवेश्वरांनी केले. तत्कालीन समाजातील लोकांचा कर्मकाण्ड व अंधविश्वास पाहून त्यांचे मत त्यांना स्वस्थ बसु देईना. ते वैदीक परंपरा विरोधी होते. कल्याण येथे बिज्जल दरबारात बसवेश्वरांचे मामा बलदेव नोकरीस होते. त्यांनी बसेवश्वरांस कल्याणला नेऊन तेथे नोकरी देववीली व आपली कन्या गंगाबिकाचा विवाह त्यांचे सोबत लावून दिला.
बसवेश्वरांची योग्यता ओळखून बिज्जलाने त्यांना कोषाध्यक्ष केले व आपली बहीण निलंबिका हिचा विवाह बसवेश्वरांशी लावून दिला.
लोकोद्धार करण्यासाठी जणू काही पंचायतच त्यांच्याबरोबर तयार झाले. त्यात बहीण अक्कु, तिचे पती शिवदेव, भाचा चन्नबसेश्वर, पत्नी गंगाबिका यांचा समावेश होता.
लोकोद्धाराची अनेक कामे यांनी पार पाडली
( आधारीत्त )
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०, ९८३४८६८८६५.
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

Comments
Post a Comment