सुखाचा शोध In the search of happiness
👁🌴👁
*वाचावे आनंदे!* ७
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸 . ॥ *सुखाचा शोध* ॥ 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 आता तरी देवा मला पावशील का ? सुख सुख म्हणत्यात ते दावशील का ?
. माणसाच्या कित्येक खटपटींचा मुलाधार सुखाची आस आहे!
'स्वान्त सुखाय... ' माणूस धडपडत असतो ! . जीवनाच्या उलाढालीत फार कमीजणांना सुखाचा सदरा गवसतो ... नाहीतर अनेक जणांच्या अंगावर पार भोकं असलेलं कापड राहतं ! 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸💥
१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड करीत
होते...
त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा दिला .
प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर आपले नाव टाकून
हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व लोक कामाला लागले.
प्रत्येक जण आपण फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत
होता. बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...
नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून
स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!!
इतक्या भरगच्च फुग्यांतून
स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ उडाली. ५
मिनिटे संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू
शकला नाही!!
... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव असलेला एक
फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक फुगा उचलला.
वक्त्याने प्रत्येकाला सांगितले की आपल्याकडे
ज्याच्या नावाचा फुगा आहे त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.
अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर ज्याचे
नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २मिनिटांत
प्रत्येकाकडे स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!
यावर तो वक्ता बोलू लागला…
"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण आनंद,
सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग जंग
पछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे
याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात
दडलेला असतात. इतरांना त्यांचा आनंद
द्या आणि त्याबदल्यात तुम्हालाही नक्कीच आनंद
आणि समाधान मिळेल. मानवी आयुष्याच्या यशाचे खरे
गमक यातच आहे...." हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द
झाला....
🔹🔹🔹🔹🔹🔹
सुखाचं गारुड मानवी जीवनावर एवढं की साधू संताना ही _ . 'अवघाची संसार सुखाचा करीन ' अशी प्रतिज्ञा घेत संसारी लोकांची भलावण करावी लागली आहे... पण
*आपण काय लक्षात ठेवावं - 'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. '... दान देऊन वाढणाऱ्या गोष्टीत सुखाचाही समावेश करून टाका*
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०, ९८३४८६८८६५.
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

Comments
Post a Comment