Maharani Yesubai
👁🌴👁
*वाचावे आनंदे!* ४
यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
॥ *रुजलेले विचार*॥
भावकीची सुंदोपसुंदी इतिहासाला भलतीच वळणे देत जाते.
शत्रुशी लढणे सोपे, पण स्वकीयांशी लढणे अवघड होऊन जाते !
छ. शिवरायांचे मृत्यूनंतर वारसा हक्कावरुन कुरबुरी झाल्याही असतील... पण काही माणसं हेवेदावे, द्वेष यापेक्षा सर्वसमावेशक , समष्टिकल्याणार्थ सर्वस्व वाहतात.
त्यांचे त्यागावर, बलीदानावर इतिहासाची मंगलमंदिरे उभी राहतात...
छ. संभाजी महाराजांचे मृत्यूनंतर ,औरंगजेबाने अत्यंत त्वेषाने स्वराज्यावर झडप घातली.. ..
रायगडला वेढा पडला...
महाराणी येसूबाई, पुत्र छ.शाहू , छ.राजाराम गडावर अडकलेले. !
प्रसंग बाका ! रायगड पडण्याची वेळ , .. सगळा काफिला यवनांच्या हातात पडण्याची शक्यता .....
सारे स्वराज्यच धोक्यात..
अशावेळी म. येसूबाई निर्णय घेतात - छ. राजारामांनी लढाईत न गुंतता.., गडावरून बाहेर पडून जिंजी गाठायचे !...
येसूबाई छोट्या छ.शाहू सह गडावरच राहतील...
म्हणजे शत्रुचे लक्ष.. गडावर राहील अनं छ.राजारामांना पळून जाणे शक्य होईल.
पुढील इतिहास ज्ञात आहेच !
छ.राजाराम जिंजीस पोहचले.... छत्रपतींची एक पाती काळाशी लढा देण्यास सजग राहिली..
रायगड, महाराणी येसूबाई आणि छोटे छ.शाहू औरंगजेबाचे ताब्यात गेले !
शिवरायांचे विचारात वाढलेली माणसं कशी होती ,याचा हा विचार..
ऐरवी घरभेदी ,घरफोड्या विचारांबाबत विशीष्ट प्रवृत्तीस तोशीस धरले जाते.
पण काळासमोर मृत्युंजय विचार मांडणारी माणसं विरळीच .. महाराणी येसूबाई त्या नामावलीतील !
.. छ्त्रपतींचे विचारांच्या खऱ्या पाईक... त्यागी स्नुषा !
धन्य त्या विचारांची !
( शिवजयंती , परंपरेनुसार - १७.४.२०१८ )
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
९५६११५४१४०, ९८३४८६८८६५.
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

Comments
Post a Comment