गांधींनी आभाळ पेलले सारे
गांधींनी आभाळ पेलले सारे 🌸🍃🌺🍂🌿🍃🌸 भेदाभेदाच्या भिंती होत जातसे अभंग दिला एकच त्याला भारतीयत्वाचा रंग खाचखळगे निसर रस्ता अखंड,निश्चयी चालणे गांधींनी आभाळ पेलले सारे - १ अज्ञानाचे धूके भारतवर्षा भोवती जगापासून दूर गतैत सापडे मती दिली गती विचारा, पोलादी प्रयत्ने गांधींनी आभाळ पेलले सारे - २ लाखोंची बॅरिस्टरी परंपरेचा दिवाण कारभारी वसन, सदन आर्थिक झरे इच्छा ,आकांक्षा संसारी देशसंसाराप्रत सर्वस्व त्यागले गांधींनी आभाळ पेलले सारे - ३ सक्षम विरोधक इंग्रज ठाके गुलामगिरी मनी,प्रसंग बाके परंपरेने हतबल जो-तो वाके घडवीत बदल जाई काळापुढे नाही नुसते क्रांतीचे नारे गांधींनी आभाळ पेलले सारे - ४ निर्भयतेचा मंत्र देई गांधी राजकर्त्यांची होई वांदी नेता सामान्य सर्वां सांधी एकरूप सर्व होऊन राही मंत्र दिला निर्भय तुम्ही व्हा रे ! गांधींनी आभाळ पेलले सारे - ५ लोकांस लोक जोडून भेदांच्या भिंती तोडूनी परंपरेची वाट मोडूनी नवमार्ग सर्वां दावूनी एकतेचे वाहिले वारे गांधींनी आभाळ पेलले सारे -६ दिला चलेजावचा नारा चवताळे देश उठला सारा विविधांगी उचली क्...