आत्मविश्वास
*॥👁वाचावे आनंदे!II*
. राजेंद्र गुरव, यमाई औंध
*#आत्मविश्वास#*
.
मध्यंतरी आत्मविश्वास नावाचा एक सिनेमा आला होता . ' संसाराचा गाडा ओढताना खिचपत पडलेली स्त्री . !सर्वांच्या अपेक्षांच्या डोंगराखाली अडकलेली !
तिला तिची पूर्वाश्रमीची मैत्रीण भेटते !.. दया डोंगरे !
ती तीला आत्मविश्वास देते आणि तिच्या जीवनात परिवर्तन घडून येते . असा कथाभाग ! '
आत्मविश्वास म्हणजे स्वतःलाच जागे करणे ! ' तुझं आहे तुजपाशी , परी जागा चुकलाशी ' अशी अवस्था काहींची होते.
पण वेळीच दिलेला आत्मविश्वास त्याचे जीवन उन्नत करुन जातो. मनाची चंचलता नष्ट होते . बुद्धीला नवे तेज येते... हजरजबाबीपणा येतो.निर्णयक्षमता येते
असाच बोध देणारी गोष्ट वाचलेली...
-'एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिशेल सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते
हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगीत बोलू शकतो का?
ओबामांनी होकार दिला.
त्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले " असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगीत बोलवेसे वाटले?"
तिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा झाला होता
ओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां. "आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण असतीस."
ती आत्मविश्वासाने उत्तरली, "अजिबात नाही. जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकेचा अध्यक्ष असता!."
आत्मविश्वास असावा तर असा....
.... गोष्ट आत्मविश्वासाची - मनाबरोबर शरीराला ही उभारी देते . बौद्दिक ,शारीरिक , मानसिक कष्ट करण्याची क्षमता वाढविते.
- समुद्र काठांवर उभ्या असलेल्या हनुमंताला जेष्ठ जांबुवंताने विश्वास दिला, ... अनं समुद्र पार पडला , सैन्येचा शोध मोहीमेचा मार्ग मार्गी लागला!
आत्मविश्वास उत्कर्षाचे अनेक मार्ग प्रशस्त करीत जातो ! .. *परिसाचे स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे .. तसचं आत्मविश्वासाने जीवनाचे होऊन जाते !*
☘☘💥☘☘💥☘☘
🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉
Comments
Post a Comment