वसंत व संत

*॥👁वाचावे आनंदे👁॥!*

                     राजेंद्र गुरव, यमाई औंध

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


*॥वसंत व संत ॥*


'माणूसकी ' वगैरे गोष्टीवरील चर्चा आपण ऐकतो, वाचतो... लिहतो !माणूसकीच्या गोष्टी ऐकून गहिवर येतो ! कुणावर बेतलेले संकट आपलं वाटायला लागतं . त्याच्या दुःखाशी आपण तादाम्य पावतो !

                             

कारण आपण सारे मानव !

                                      

परवा - परवा हे कोठेतरी वाचनात आले.  *एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं.....आजोबा स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी*,

*आजोबा:माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिलकुल स्पर्धा नाही....!*"'


*नसेल ही स्पर्धा ! हजारों काजव्यांचे प्रकाशाने नाही जीवनमान उजळून जात ! .... एखादा 'रवीकर ' ही पुरा आहे त्यास !...   दाटून आला जरी तिमीर ,त्यात उभा राहतो दीपस्तंभ !*


सावित्री नदीतील ती दूर्घटना .... ( मागे घडलेली, त्यावेळी लिहलेली )

... काळरात्र माजलेली..,शेकडों जणांचा जीव पाण्याखाली घुटमळलेले !

  

महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानं दोनबस वाहून गेलेल्या !

घनदाट अंधारात, पावसाळी वातावरणामुळे जग यापासून अनभिज्ञ ! बेसावध वाहतुक काळाच्या कराल जबड्यात जाण्याची शक्यता !

 ...                        

 संकटसमयीच सज्जन शक्तीचा नव्याने शोध लागतो, रुक्ष वातावरणातच वसंत फुलतो !

' बसंत कुमार 'नावाचा ' धाडसी वीर या समयी धावला त्याचे

समयसूचकतेने शेकडो जीव वाचले !

 🔹🔹🔹

व्हॉटसअॅप वरची त्याची चित्रकथा बातमीतून वाचलेली. महाडच्या सावित्रीचा  पूल जिथं सुरु होतो, त्याला चिटकून बसंत कुमारचं गॅरेज आहे. पंक्चर काढणं, हायवेवर वाहनं बंद पडली तर त्यांच्या मदतीला धावणं हे त्याचं नित्याचं काम.


त्या दिवशी (काल )हाच बसंतकुमार काळ्यामिट्ट अंधारात धावून आला. गॅरेजमधूनच त्यानं दोन बसेस पुलासकट नदीत वाहून गेल्याचं पाहिलं.  त्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्यातूनही स्वत:ला सावरत तो रस्त्यावर आला.


उरलेल्या वाहनांना त्यानं पुढं जाऊच दिलं नाही. एकदा विचार करा, जर बसंतकुमार रस्त्यावर उभा राहिला नसता तर? 

अजून किती जणांना जलसमाधी मिळाली असती ?

...काळ्यामिट्ट अंधारात आणि तुफान कोसळत्या पावसात जिथं फूटभर अंतरावरचा माणूस दिसत नव्हता, पण तरीही त्या काळरात्री बसंत शेकडो जणांसाठी देवदूतासारखा धावून आला.


बसंत कुमारनचं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 


सकाळपर्यंत बसंत कुमार घटनास्थळावरच होता. एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाला त्यानं घटनेची माहिती दिली आणि त्यानुसारच शोधकार्यही सुरु करण्यात आलं. सावित्री प्रचंड खवळली आहे, पाण्याला इतका जोर असल्यानं पात्रात पडलेली वाहनं कुठवर गेली असतील हे सांगणं कठीण आहे.


लोक देव शोधण्यासाठी मंदिर, मुर्ती आणि दर्ग्यांकडे धाव घेतात. पण देव अशाच बसंत कुमार रुपानं धावून येतो ! संकटात, निसर्गाच्या रौद्र रूपात, मानव कचाट्यात सापडतो तेव्हांही !


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


तिमीरातून प्रवास करणाऱ्यास एका प्रकाशकिरणांचा सहारा पुरेसा होतो.

बुडणाऱ्यास काठीचा !

तसाचं मानवतेला आधार होता अशा फुलणाऱ्या वसंताचा !

☘☘💥☘☘💥☘☘

🕉राजेंद्र गुरव, यमाई औंध ,९५६११५४१४०, guravrajendra546@gmail.com☘☘☘💥☘☘🕉

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510