महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !
👁️🌴👁️
*वाचावे आनंदे*
यमाई औंध,राजेंद्र गुरव
🇮🇳 *महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या अनेक शुभेच्छा!*
महाराष्ट्राला स्वतःचा वैभवशाली इतिहास आहे... आणि वैशिष्ट्यपूर्ण भूगोल ही ! वैभवशाली महाराष्ट्र भारताभू एक गौरवशाली भाग आहे ! चालुक्य ,वाकाटक, शिलाहार ,यादव, छ. शिवराय अशा उत्तुंग राजवटी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत.
महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावर स्वतःची अशी संस्कृती हजारो वर्ष निपजत असलेली, प्रवाहीत होत असलेली दिसून येते.
आजही महाराष्ट्र म्हणजे भारत देशाचे चैतन्य आहे. अनेक आर्थिक वाहिन्या महाराष्ट्रातून वाहतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मजबूत भारताचा महाराष्ट्र म्हणजे कणा आहे.
*महाराष्ट्राच्या किर्तीचा ध्वज फडकत राहो!*
*दिनदिन महाराष्ट्र चमकत राहो !*
उन्नत घडत, पोषित होऊ दे,
दहा दिशांनी विकसित होऊ दे !
महाराष्ट्र माथा उन्नत पाहो
किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥
*संतांची ,योग्यांची ही भूमी*
*शुरविरांची, कर्मवंतीची भूमी*
*देश विकासा हातभार लागो*
*किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥*
महाराष्ट्र अनं देशाच्या एकच आकांक्षा
बळकट जन गण मन या सदिच्छा ॥
चैतन्याचा मार्ग प्रदीप्त होवो
किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥
*प्रगतीच्या वाटा अखंड चालू दे*
*यशाचे उत्तुंग गौरीशंकर गाठू दे !*
*सर्वजन सुखी समाधानी होवो*
*किर्तीचा ध्वज फडकत राहो ॥*
आज जागतिक कामगार दिन ही आहे. कामगारांच्या कष्टावर ,मनगटाच्या करामतीवर, मेहनतीवर अवघं विश्व तरलेलं आहे.
त्यांच्या श्रमावर डबडबलेल्या घामांवर मानवी जीवीताचं, मानवी संस्कृतीचे एकूणच जीवीतांच्या जगण्याचही पोषण होत आहे .ती सर्व कामगार मंडळी श्रमवंतासाठी, ज्ञानवंतासाठी, सर्वसामान्यांसाठी पूजनीय आहेत.
सशक्त आणि कुशल कामगार हे देशाच्या प्रगतीचे यादृच्छिक लक्षण आहे. उद्याच्या प्रगतीच्या वाटा चालतानाही उत्तम कामगारांची कुशल कामगारांची आपल्याला नेहमीच गरज राहणार आहे.
कामगार दिनानिमित्त त्या तमाम श्रमवंतांना मानाचा मुजरा !
आदिम काळापासून चालत आलेल्या कृषक संस्कृतीमध्ये कामगारांना प्रतिष्ठा होतीच. देवांचे देव महादेव आपल्या दर्शना अगोदर नंदीचे दर्शन घ्यायला सांगतात. वृषभ नंदीच्या कष्टावर शेत पिकतात, जीविताची पोटं भरतात. जीवनाचे पोषण होते. त्या कष्ट करण्याला सलाम करण्याची वृत्ती शिव महादेव यांच्या वृत्तीत होती. श्रम प्रतिष्ठेला हा मानाचा मुजरा होता !
उन्नतीच्या विकसित वाटा होऊ दे I
महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या पाठीवर सदैव सौख्य राहू दे I
आता या निमित्त हयाच शुभेच्छा !
🇮🇳🌟🌿🍂🌺🌸
@राजेंद्र गुरव
९५६११५४०
☘मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in🌺🌸🕉🍁🇮🇳
Comments
Post a Comment