तो दिस पहिला..

 तो दिस पहिला गोड होता !


अवचित भेटणे आणि...

ते डोळ्यांचे मिळणे

मिसळूनी जाणे, एक होणे

त्या किमयेस जोड नव्हता

तो दिस पहिला गोड होता ! 


ते शब्दांचे कातरणे

मनही दडपून जाणे

भावांची गर्दी होणे

चुकांतही अल्लड गोडवा होता

तो दिस पहिला गोड होता !


स्पर्शाचे ओझरते देणे

क्षणांचे झाले जणू लेणे

आता दुनियेशी देणे न घेणे

गोड अनुभूतींचा मारवा होता ॥

तो दिस पहिला गोड होता !


थेंबाने धूंद होणे

एकतारी गीत गाणे

ते क्षणांचे देणे घेणे

क्षण विश्वरूप वाटला होता

तो दिस पहिला गोड होता !


आपुले आपल्याशी बोलणे

इतर संवेदना बोथट होणे

मनाचे पुनः पुन्हा मिसळणे

त्या आठवणींचा गारवा होता

तो दिस पहिला गोड होता !

              यमाई औंध,राजेंद्र गुरव

                ( कृष्णनंदन )

                  ९५६११५४१४०

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510