माझ्या अत्यांच्या पावलांनी

 माझ्या अत्यांच्या पावलांनी


अत्यांच्या पावलांनी

गतकाळ घरी येतो

स्मृतींचे बोट धरुनीं

माहेरी विसावतो ॥


अत्यांच्या आठवासंगे

आम्ही चिंब नाहतो

तिच्या शब्दचित्रासह

स्मृती सरितेत वाहतो ॥


अत्यांच्या आठवणी

चहुबाजूंनी उतू जातात

डोळ्यांसमोर क्षणांच्या

मैफिली रंगवितात ॥


बाप जरी गेला

काही वर्षापूर्वी

आत्यांच्या पाठी दिसते

त्याची सावली खरी ॥


माझा बाप असता तर

कशी असती पाठवण ?

कसा वागला बोलला

स्मरते पार्श्वभूमी आठवण ॥


असे प्रश्न सदा

भोवती  गुंज करतात

माझ्या मनांतरी

प्रश्नचिन्हं उमटतात !


अत्यांच्या असण्याने

बापाचे जीवंत होणे

तिच्या वागण्या बोलण्यात

बापाचे अस्तीत्व प्रकटणे ॥


आत्याच्या चेहऱ्यावर

भूतकाळाची स्मरणे

तिच्याच्या शब्दात

काळाचे सहज विरणे ॥


माझ्या अत्यांच्या येण्यात

स्मृतींची सुगंधी पर्वणी 

तिच्या सहवासात 

जीवन गाण्या गवसणी ॥

            यमाई औंध,राजेंद्र गुरव

                 ९५६११५४१४०

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510