संगत relationship

👁🌴👁
*वाचावे आनंदे!* 23
                 यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘
॥ *संगत* ॥
माणसाची किंमत त्याचे संगतीवरून होते अशी लोकम्हण रुढ आहे.

संत तुकाराम सारखे संत पुरुष उत्तम संगतीसाठी परमेश्वर चरणी धावा करतात
सुसंगती सदा घडो... ही मागणीच संगतीचे महत्व सांगणारी आहे.

आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो.
 संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे.
ज्याच्याशी आपण संगत करावी, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात  तर संगतीने काही गुण नष्ट होतात.
*कर्पूरासी झाला दिपाचा शेजार , काय त्याचा गुण राहिला सार ?*

दीव्याच्या संगतीनं शुभ्र कापूर नष्टच होतो.

एक उदा.घ्या - काही लोकांनी इथे यायचे ठरविले. एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसर्‍याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल; म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले.
संगतीची दुसरी गंमत अशी की, ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लोप पावते. इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले, तर कुणी डॉक्टर झाले. परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्ने केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील; परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीणबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ! आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. उलट सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्‌वासना आणि सद्‌विचार प्राप्त होतात.

एखादा साधू बैरागी असेल. तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील. समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील, 'मी भिक्षेची झोळी घेतो, तूही घे; दोघेही भिक्षा मागून आणू , आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ.'

चंदनाचे सहवासानाने बोरी - बाभळींना ही सुगंध प्राप्त होतो...
उत्तम संगतीने मानवी जीवनासही तशीच गती प्राप्त होते.

🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510