महाराष्ट्र गाणं Maharashtra gaane

👁🌴👁
*वाचावे आनंदे!* १७
                 यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘

*महाराष्ट्र गाणं*

महाराष्ट्राच्या प्रगतीची उंच उंच शिखरे
दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥

शिवरायांचा नितीचा असे आम्हां वारसा
काळाशी झुंजताना तोची आम्हां आरसा ॥
काळाची आव्हाने  स्वीकारा , जा उत्कर्षाकडे
दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥1

ज्ञान विज्ञानाच्या वाटा चालती सह्यगिरीचे कडे
ग्राकाळासह उद्याच्या स्वागता घुमती चौघडे
नावासह कर्तृत्वाने..., भारतवर्षी मिरवे
दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥2

संत महात्मे, शूर विरांची धन्य ही भूमी
सदा पुढेच पाऊले, ग्वाही देतो आम्ही ॥
काळाची भालावरती उमटू दे महाराष्ट्र पाऊले
दिवसागणिक प्रगतीसह महाराष्ट्र निखरे ॥3

जय महाराष्ट्र, जय हिंद !

रचना - १ मे २०१८
🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510