मानवतेचे गाणे, Humanity

👁🌴👁
*वाचावे आनंदे!* १८
                 यमाई औंध, राजेंद्र गुरव
🍀🌸🌿🍂🌺 T🍁🌿🌸☘
॥ *गाऊ मानवतेचे गाणे* ॥

 मुंबईच्या रस्तावर भिकारी भिक मागतं होता...
गाणे म्हणत होता,... येणारे - जाणारे पैसे देत
कमाई जेमतेम...

एक सद्‌गृहस्थ रस्ताने चालले होते...
भिकाऱ्याकडे पाहून हात खिश्याकडे गेला...

पण खिश्यात पैसे नव्हते..
आपण भिकाऱ्याला पैसे देऊ शकलो नाही याचे त्या गृहस्थास शल्य वाटले असावे.

क्षणभरात तो गृहस्थ भिकाऱ्याच्या शेजारी जाऊन बसला...

 कानावर पडलेले सुमधुर स्वर ऐकून तो भिकारी चकीतच झाला.
त्या सद्गृहस्थाचे स्वर्गीय स्वराने ते वातावरण भरून गेले.

भिकाऱ्याच्या ताटात पैश्याचा सडा पडला...
तो खणखणाट आगळाच नाद देत होता.

भिकाऱ्याने हर्षानंदाने त्या गायकाचे हात हातात घेतले...
भिकाऱ्यास दिलासा देत तो गायक आनंदाने उठला व मार्गस्थ झाला..

कोण होते ते गृहस्थ !..

जगविख्यात गायक स्व.मोहम्मद रफी साहेब !
मोठा गायक... मोठा माणूसही !

मा.विद्याधर शुक्ल (.माजी शिक्षण संचालक ) साहेबांनी मला एका प्रसिद्ध गायकेची व्हिडीओ क्लिप पाठविली..

क्लिप मध्ये एक आंधळी स्त्री गाणे गात आहे...
योगायोगाने त्या प्रसिद्ध गाण्याची गायिका तेथे येते....
ती गायिका आहे मारिया.. प्रसिद्ध मेक्सियन गायिका...

गाणे ऐकताना कदाचित शद्ब  कळणार नाही.... वा अर्थ !

पण त्या दोघींचा  प्रतिसाद पाहून... आपलं मन ही प्रतिसाद देऊ लागत...
*शब्द, अर्थ, भाषा, देश*... *यांच्या पलीकडचे* ... *या ह्रदयीचे त्या ह्रदयी  जाणणारे, सांडणारे*.. भाव जाणणारे, भावस्पर्शी
*मानवतेचे गाणे* !*

स्व. रफी साहेबांचा किस्सा पुनः आठवून देणारे ! ही क्लिप तुमच्या ह्रदयात झंकारेल _ मानवतेचे गाणे

🇮🇳🕉🌸☘💫🌷🍂🦅
यमाई औंध, राजेंद्र गुरव
What's app no 8275370028
९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
मागील लेख वाचण्यासाठी
guravraj.blogspot.in 🕉☘💫🍂🌸🌿🍂🇮🇳

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510