परंपराचे बोट, traditional way
झेन गुरू ८० वर्षांचे झाले, म्हणाले, आता मरणघटिका समीप आली. सगळे शिष्य गोळा झाले. म्हणाले, गुरुजी, तुमच्याबरोबर तुमचं मार्गदर्शनही हरवणार. तुम्ही एखादं पुस्तक तरी लिहायला हवं होतं. आमच्यासाठी तो धर्मग्रंथ ठरला असता. गुरू म्हणाले, म्हणूनच नाही लिहिला. तुम्ही जुन्या काळाला, माणसांना आणि मतांना पकडून ठेवण्यात पटाईत आहात. त्यात तुम्हाला नव्याने विचार न करण्याची सोय सापडते. मी आयुष्यभर सगळ्या तथाकथित धर्मग्रंथांची होळी केली, सत्य हे शब्दातीत आहे, हे सांगत राहिलो आणि मीच ग्रंथ लिहू? पण, शिष्य ऐकेनात. म्हणाले, फार मोठं नाही, मार्गदर्शक सूत्रांपुरतं लिहा. तुम्हाला गवसलेलं सत्य लिहा. काहीतरी लिहा. काही दिवसांनी गुरू मरणशय्येवर पोहोचला. सगळे शिष्य भोवती गोळा झाले. गुरूने उशाखालून एक चोपडी काढली आणि सांगितलं, हा घ्या माझा ग्रंथ. माझी सगळी शिकवण यात लिहिली आहे. यात जीवनाचं सार आहे. गुरूने प्रमुख शिष्याला जवळ बोलावून ती चोपडी त्याच्या हातात दिली. त्याने क्षणाचाही विचार न करता, विलंब न लावता ती चोपडी समोरच्या आगीत फेकून दिली. बाकीचे शिष्य चपापले, काही विलाप करू लागले. गुरूने ...