सामोरे जा !
*॥👁वाचावे आनंदे👁॥* . राजेंद्र गुरव, यमाई औंध *॥सामोरे जा ॥* '*' *कुणाचे जीवनी आले नाही संकट* ? *कुणाचा मार्ग सदा निष्कंटक |?*' संकट, आपत्ती, दुदैव जीवनाचा अविभाज्य भाग आहे ! माणसाची खरी परीक्षा संकटात होते.. .. तो संकटाला कसे सामोरे जातो यावरुन तो ओळखला जातो ! अपंगत्वावर मात करणारी हेलन केलर, ... कर्ज अन अपयशला पन्नाशीत सामोरा जाणारा अमिताभ ! .. .. पाण्याची कमतरता पण त्याला सामोरे गेलेले इस्त्राईल ! ... याच जातकुळीतले एक उदाहरण वाचलेले - दुसऱ्या ग्रुपवर आलेले ! .. १८ वर्षांची *युसरामर्दीनी* रिओ ऑलीम्पीक मध्ये पोहण्याच्या शर्यतीत भाग घेणार्या या मुलीने जिद्दीचं आणि शौर्याचं एक अनोखं उदाहरण जगासमोर आणलं आहे. युसरा या ऑलीम्पीक मध्ये कोणत्याच देशाचं प्रतीनीधीत्व करत नाही आहे. ती निर्वासितांच्या ( Refugee Camp) संघाकडून खेळत आहे. जिचं ...