मुग्ध कळी
ती मुग्ध स्तब्ध कळी
मनात रुतूनी बसली
जणू लावण्याची खणी
तारुण्यतिरावरी वसली ॥
शब्द अबोल मुग्धबालेचे
परी अस्तीत्व बोलते
मंतरलेल्या बहूलोकांची
नजर सदा ती तोलते ॥
ओढूनी घेतो गंध
करी हालचाली मंद
हेलपाटी जीवाला
लावी आगळा छंद ॥
नजर करी काबीज
विचार बीज ओढुनी
गुंजारती नित भ्रमर
लोकलज्जा सोडुनी ॥
ढळला हिरवा पदर
अवचित माथ्यांवरूनी
गुलाबी रहस्य सदर
वाहते ओसांडूनी ॥
भ्रमराची बाधी होऊनी
कित्येक झाले भ्रमित
वर ' प्राप्त एखादयास
बाकी नको ठरू शापीत ॥
[08/10, 9:49 AM]
यमाई औंध ,राजेंद्र गुरव
Comments
Post a Comment