रंग होळीचे
वसंताच्या चाहूलीत
आले होळीला उधाण
स्वागतीला पालवीने
केली रंगांची पखरण
चौफेर उधळले,माखले
रंग रंगीले फुलफुलांचे
दाटले छत उतरले
स्वर्गातून किती मजेचे?
रंगरंगील्या रंगांची
जो तो दंग, महती गात
मंतरलेला निश्चल निश्चित
उभा आहे एका सुरात |
रंगाची खाण आपसूक
दावे किती विविधता
डंका पसरे चोहीकडे
उधळे सौंदर्य शुद्धता
कोणी पाहे रंग रुप
कोणी निवडला आकार
विविधांगा एका जागी
हर मनींचे स्वप्नं साकार ॥
जणू रंग अवघा आसमंती पुरला
श्रीरंग त्या रंगमोहनीत उतरला
रंगमाला नशीला उरल्या नयनात
सप्तसुर बासरीचे निनादे गगनात I
रंगांची मदहोष पखरण
मोहीनी शिंपडली आसमंतात
मनाचे होडी रंगाचेच तरंग
श्रीरंग पडे चपलख संभ्रमांत I
@राजेंद्र गुरव
Comments
Post a Comment