गुंतता तुझ्यात !

 कितीही आवरल स्वतःला,तरी मन बेफाम

एक झलक तुझी, ह्रदया कसला लगाम ?


वास्तव जरी टोचले - जखम भळभळली

नशा ही चढलेली अन् गात्रं कळवळलेली ।


डोळ्यातील भावनांचा वेगळाच रंग

हृदय कालवीत, वेदनां आगळकीत दंग।


 फुटतात भलतेच शब्द, भावनांना ना आवर 

कल्पनांना पंख गुंजारत , तुझी तू सावर I


काळजाचा  घात, मन करी शंख

बसला चेहरा मख्ख ,की आतूनी डंख।


 असण्याशीच बंड करून उठते शरीर

माथ्यावरती तडतडा करते जणू शीर।


ना उमगली मती, ना मिळे ती गती

राग, द्वेष हे फुकाचे मनाची स्थिती


शद्ब कधी औषधही, कधी करतो घाव

शद्बांचा अंदाज अवचित काळजाचा ठाव।


आगळेच वागणे रितीभाती  सोडूनिया

सुगंधांवरही स्वार विसरुनी भूमिका।


संयम कुठला जीभेला वेगळीच धार 

ठेचकाळूनी विवेक खातो मधूनच मार I


भविष्यांचे अंकुर फुटती स्वप्नांना तुझा लगाम

कल्पनांही तुझ्या क्षितीजी, परिस्थितीचा गुलाम।

Comments

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510