वळणे...कळणे
साध्या सरळ आयुष्यात
येती अवचित वळणे
कधी त्यांचे छळणे
कधी नव्याने मिळणे
वळणाचे असेच
चुकवूनी दृष्टीला वळणे
मग मनाचे खवळणे
कधी हृदयाचे ढवळणे
वळणा वळणावरती
अनुभवओळख घडणे
कधी मिळमिळीत
कधी झणझणीत उरणे
कधी वळणाचा आगाऊपणा
मेंदूची शीर उठणे
कधी क्षणांचा वांझपणा
मागे भले शून्य उरणे
नव्या परिस्थितीतही जावे
मनाने स्तब्ध सामोरे
कधी गळाभेट ही ...
अभ्यासावे सारे कंगोरे
नवीकल्पना वेचीत जावे
भरावे अनुभवाचे गाठोडे
मागच्याच शहाणपण देण्या?
अनुभवांती उरावे ॥
सुंदर रचना
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete