माझी कविता म्हणते
माझीच कविता..
माझीच कविता..
कधीमधी मला शिकवते
त्या स्फुरलेल्या अंकुरात
भूतकाळाचे गीत आळवते I
माझी कविता म्हणते
मी तुझीच निर्मिती
ह्रदयातून प्रकटली
सगुण साकार आकृती |
माझी कविता म्हणते
प्रकटले जेव्हां होते दिव्य
मी धन्य होईल जेंव्हा
घडेल काही भव्य ॥
Comments
Post a Comment