तो दिस पहिला..
तो दिस पहिला गोड होता ! अवचित भेटणे आणि... ते डोळ्यांचे मिळणे मिसळूनी जाणे, एक होणे त्या किमयेस जोड नव्हता तो दिस पहिला गोड होता ! ते शब्दांचे कातरणे मनही दडपून जाणे भावांची गर्दी होणे चुकांतही अल्लड गोडवा होता तो दिस पहिला गोड होता ! स्पर्शाचे ओझरते देणे क्षणांचे झाले जणू लेणे आता दुनियेशी देणे न घेणे गोड अनुभूतींचा मारवा होता ॥ तो दिस पहिला गोड होता ! थेंबाने धूंद होणे एकतारी गीत गाणे ते क्षणांचे देणे घेणे क्षण विश्वरूप वाटला होता तो दिस पहिला गोड होता ! आपुले आपल्याशी बोलणे इतर संवेदना बोथट होणे मनाचे पुनः पुन्हा मिसळणे त्या आठवणींचा गारवा होता तो दिस पहिला गोड होता ! यमाई औंध,राजेंद्र गुरव ( कृष्णनंदन ) ९५६११५४१४०