बदल, The change
👁🌴👁 *वाचावे आनंदे!* २५ यमाई औंध, राजेंद्र गुरव 🍀🌸🌿🍂🌺🍁🌿🌸☘ ॥बदल॥ सध्या बदलीचा ऋतू आहे.. सर्व खात्यात बदल होण्यासाठी बदली नावाचे वादळ... बदली वसंत इ. हवामान प्रकार येत आहेत. बदली मुळे हे - हे बदल होणार आहेत... अशी अनेक मुद्दांंची बदली बद्दल चर्चा आहे. बदल हा जीवनाचा नियम आहे... तर बदली हा नोकरीतील नियम ! या दोन्हीत आपणास बदल करता येत नाही ! बदलीमुळे झालेल्या बदलांची जीवनाशी सांगड घालणे एवढचं आपले हाती रहाते ! *आवडलेलं काम, व्यक्ती आणि निवडलेलं .. मिळालेलं, कधी कधी माथी मारलेल ,यांचा मेळ घालणे यात आयुष्य जात.या सर्वांची जेंव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड* *".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:* *"काही क्षणासाठी व कामानिमित्त जवळ आलेली माणसे...* *काही क्षणात तुटतात, जीवनात नियती आदेश देते अन ही दूर वर जातात !* *पण विचारांनी व प्रेमानी* *जुळलेली माणसे...* *आयुष्यभर सोबत राहतात".* त्यांचे आठवण...