Shivaji the great

*॥शिवाजी आमुचा राजा॥*
यमाई औंध, राजेंद्र गुरवRajendra Gurav:

 छत्रपती शिवाजी महाराज या नावाची मोहिनी , इतकी वर्षे झाली तरी आपल्या मनाला का पडून रहावी ?

शिवजयंतीला शिवरायांचे नाम आसमंती दुमदुमतेच ! पण एरवीही कित्येकांचे मनी त्यांचे नाव गुंजन करीत रहाते !
महाराष्ट्राच्या प्रत्येक दिवशी कुठेना कुठे त्यांचे पुण्यस्मरण होतच रहाते !

शिवराय म्हणजे अखंड स्फूर्तीचा झरा आहे... त्यांचेपेक्षा बरा असा आदर्श आपल्यापुढे अद्याप निर्माण झाला नाही !

पद्मावतच्या निमित्ताने अल्लाउद्दिन खिलजीचा उद्दामपणा आपण पाहिला,.. अनुभवला !
विंध्य पर्वत ओलांडून त्याचे आक्रमण देवगिरीला भिडले !... यादवांच्या दूदैवाने देवगिरी पडला.... आणि पुढची चारशे वर्ष उभ्या महाराष्ट्रावर पाशवी युगाचा अंधार पडला !

सतराव्या शतकात शिवरायांचे रुपाने स्वराज्याचे विचार रुजेपर्यंत .. दख्खनच्या पठारावर गुलामींची कुसळच उगवीत, त्याची सल उभ्या मराठी मातीला होती.
माना खाली घालून, पाच पातशाहीच्या थपडा खात जीणं....
जगणं कसले .. मढ्यांच्या आवालादिचं !
आत्माशिवाय शरीराचं !

शिवरायांनी अशी मढी जागी केली.. त्यांना आत्मभान दिलं, त्यांच्यातील क्रयशक्ती जागवली, त्यांना एकत्र आणलं, त्यांना ध्येय दिलं... अनं स्वराज्याचा महामंत्र दिला !

हे राज्य  आपले व्हावे, परकियांची गुलामी नको हे त्यांनी निव्वळ तोंडी सांगीतले नाही... तर स्वराज्याची स्वप्नपूर्ती होण्यासाठी शिवराय स्वतः अग्निपथ चालले, .. अनेक संकटांना आपल्या शिरावर घेताना, छातीवर झेलताना , जीवघेण्या प्रसंगातून तावून- सुलाखून निघताना .. शिवरायांनी स्वराज्याचे व्रत कदापी सोडले नाही !
 शिवरायांचे या विचारांना मावळप्रातांतील थोरामोठ्यांनी जिवापाड जपले.. अनं शिवरायांनाही !
शिवरायांचे जीवाला जीव देणारी , प्रसंगी शिवरायांचा जीव वाचावा म्हणून आपल्या प्राणाची बाजी लावू पाहणारे सवंगडी , ही शिवजीवन चरित्राची परिणीती आहे.

*जाणता राजा, उत्तम प्रशासक, सर्वसामान्यांचा कनवाळू, धुरंधर योद्धा, पुरगामी विचारांचा नेता, उत्तम संघटक, शेती - जल- व्यवस्थापक* *उत्तम नियोजक.. काय वर्णावे?* ...
तो सर्वानांच अपुला वाटला.. हे शिवचरित्राचे अद्भूत यश आहे..

छ. संभाजीचे मृत्यूनंतर छ्त्रपतींचे सर्वमान्य नेतृत्व नसताना १७- १८ वर्ष बलाढयऔरंगजेबाबरोबर सर्वसामान्य लोकं हा शिवविचार घेऊन लढले.. आजही तो विचार आपल्यामध्ये स्थित आहे !धन्य त्या विचाराची !

जय भवानी ! जय शिवाजी !
[19/02 7:35 pm] Rajendra Gurav: 🕉🍀🌴🌿🦅🍀
यमाई औंध, राजेंद्र गुरव
८२७५३७००२८, ९५६११५४१४०
guravrajendra546@gmail.com
🇮🇳🕉🍀🍀🍀🍀☘🌿💐

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यमाई देवी औंध, आरती

संत काशिबा गुरव महाराज

Adress- Yamai devi Pujari Aundh ( Satara) MH 4l5510