मुग्ध कळी ती मुग्ध स्तब्ध कळी मनात रुतूनी बसली जणू लावण्याची खणी तारुण्यतिरावरी वसली ॥ शब्द अबोल मुग्धबालेचे परी अस्तीत्व बोलते मंतरलेल्या बहूलोकांची नजर सदा ती तोलते ॥ ओढूनी घेतो गंध करी हालचाली मंद हेलपाटी जीवाला लावी आगळा छंद ॥ नजर करी काबीज विचार बीज ओढुनी गुंजारती नित भ्रमर लोकलज्जा सोडुनी ॥ ढळला हिरवा पदर अवचित माथ्यांवरूनी गुलाबी रहस्य सदर वाहते ओसांडूनी ॥ भ्रमराची बाधी होऊनी कित्येक झाले भ्रमित वर ' प्राप्त एखादयास बाकी नको ठरू शापीत ॥ [08/10, 9:49 AM] यमाई औंध ,राजेंद्र गुरव
Posts
Showing posts from April, 2021
महात्मा फुले
- Get link
- X
- Other Apps
👁️🌴👁️ *वाचावे आनंदे* यमाई औंध ,राजेंद्र गुरव *महात्मा जोतीराव गोविंदराव फुले* ज्योत लावली शिक्षणाची तिमिर मिटविला अज्ञानाचा रावा पासून रंका पर्यंत वसंत फुलवला ज्ञानाचा फुले म्हणुनी झाले थोर लेवुनि महात्म्याचे मोल ह्रदयी आमच्या नेहमी रहावे महात्मा फुल्यांचे बोल म फुले म्हणजे क्रांतीसूर्य, द्रष्टा महात्मा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक लेखक, विचारवंत होत. त्यांचा जन्मदिन - एप्रिल ११ इ.स. १८२७ होय तर मृत्यूदिन नोव्हेंबर २८, इ.स. १८९० . महात्मा फुले हे द्रष्टे व कर्ते बंडखोर समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे वि...