Posts

Showing posts from March, 2021

रंग होळीचे

 वसंताच्या चाहूलीत आले होळीला उधाण स्वागतीला पालवीने  केली रंगांची पखरण चौफेर उधळले,माखले  रंग रंगीले फुलफुलांचे  दाटले छत उतरले स्वर्गातून किती मजेचे? रंगरंगील्या रंगांची  जो तो दंग, महती गात  मंतरलेला निश्चल निश्चित उभा आहे एका सुरात |  रंगाची खाण आपसूक दावे  किती विविधता  डंका पसरे चोहीकडे उधळे सौंदर्य  शुद्धता कोणी पाहे रंग रुप  कोणी निवडला आकार विविधांगा एका जागी  हर मनींचे स्वप्नं साकार ॥ जणू रंग अवघा आसमंती पुरला  श्रीरंग त्या रंगमोहनीत उतरला  रंगमाला नशीला उरल्या नयनात  सप्तसुर बासरीचे  निनादे गगनात I रंगांची मदहोष पखरण मोहीनी शिंपडली आसमंतात मनाचे होडी रंगाचेच तरंग श्रीरंग पडे चपलख संभ्रमांत I @राजेंद्र गुरव

कलाकार

 रंग,रेषा, आकार, शब्द  अंतरीचे वापरूनही खास  चित्र ,काव्य... साधना  निर्मिते कलेचा आभास  श्रेष्ठ आवलिया तो शिल्पकार  कलाकृतीला परिपूर्ण आकार ॥

गुंतता तुझ्यात !

 कितीही आवरल स्वतःला,तरी मन बेफाम एक झलक तुझी, ह्रदया कसला लगाम ? वास्तव जरी टोचले - जखम भळभळली नशा ही चढलेली अन् गात्रं कळवळलेली । डोळ्यातील भावनांचा वेगळाच रंग हृदय कालवीत, वेदनां आगळकीत दंग।  फुटतात भलतेच शब्द, भावनांना ना आवर  कल्पनांना पंख गुंजारत , तुझी तू सावर I काळजाचा  घात, मन करी शंख बसला चेहरा मख्ख ,की आतूनी डंख।  असण्याशीच बंड करून उठते शरीर माथ्यावरती तडतडा करते जणू शीर। ना उमगली मती, ना मिळे ती गती राग, द्वेष हे फुकाचे मनाची स्थिती शद्ब कधी औषधही, कधी करतो घाव शद्बांचा अंदाज अवचित काळजाचा ठाव। आगळेच वागणे रितीभाती  सोडूनिया सुगंधांवरही स्वार विसरुनी भूमिका। संयम कुठला जीभेला वेगळीच धार  ठेचकाळूनी विवेक खातो मधूनच मार I भविष्यांचे अंकुर फुटती स्वप्नांना तुझा लगाम कल्पनांही तुझ्या क्षितीजी, परिस्थितीचा गुलाम।