Posts

Showing posts from November, 2021

गुरुद्वादशी व भगवान शिव

 *वसु बारस_2 यादिवशी गुरुद्वादशी  साजरी केली जाते*  आपल्या संस्कृती मधील महान गुरू परंपरांचे या दिवशी स्मरण केले जाते. भगवान महादेव हे आदीगुरु ,आदिनाथ, योगेश्वर ,योगीनाथ म्हणून संपूर्ण भारतामध्ये पूजले जातात आणि वैभवशाली समृद्ध गुरुपरंपरा भगवान शिवापासून सुरू झालेल्या आहेत. भगवान शिव हे नटराज असून अनेक कलांची उद्गाते आहेत. त्यांच्यापासूनच अनेक कलांची निर्मिती झाली आहे.विविध  कला परंपरेने शिकवणारी गुरु-शिष्य परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. अनेक आध्यात्मिक पंथ शंकराच्या विचारधारा घेऊन आपल्या संस्कृतीचं भरण-पोषण करीत आलेले आहेत. गुरु परंपरा ही त्यातील उत्तम परंपरा आहे . (ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तिनाथ हे नाथपंथीय होते. तर ज्ञानेश्वर स्वतःची ओळख सांगताना ,*आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा* आदिनाथ महादेवांच्या सन्मान करताना गुरुपरंपरेचे महत्त्वही विशद करतात. )  आयुर्वेद शास्त्र यासंबंधीही भगवान महादेव यांचे योगदान आहे म्हणून त्यांना वैद्यनाथ असेही संबोधले जाते. बेलाचे पान रुद्राक्ष हे अत्यंत औषधी गुणकारी आहे.हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे.  बेलाचे पान हे त्र...