Posts

Showing posts from October, 2021

नवरात्र अष्टमी* 2021

 *नवरात्र अष्टमी* नवरात्र अष्टमी महाष्टमी म्हणूनही ओळखले जाते. सर्वसाधारण भक्तासाठी अष्टमी अत्यंत महत्त्वाची आहे .तसेच ती साधकांसाठी, साधू संत, शैवपंथीय नाथपंथीय इत्यादी योगीलोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज दिवसभर शक्तीची साधना केली जाते.  देवीने महिषासुरादी अनेक  राक्षस आज मारले अशा प्रकारच्या कथा भागा भागात प्रचलित आहेत.  ज्यांना नवरात्राचे नऊ दिवस उपवास काही कारणाने जमत नाहीत ते लोक आज् अहोरात्र उपवास करून नवमीला  घट उठल्यानंतर उपवास  सोडतात.  श्री यमाई देवी मूळपीठ  औंध आज अष्टमी निमित्त दुपारी देवीचा छबिना असतो.अलंकृत पूजा करून उत्सवमूर्ती पालखीत आरूढ होते आणि मंदिराला पाच प्रदक्षिणा घालते.