Posts

Showing posts from February, 2018

Shivaji the great

*॥शिवाजी आमुचा राजा॥* यमाई औंध, राजेंद्र गुरवRajendra Gurav:  छत्रपती शिवाजी महाराज या नावाची मोहिनी , इतकी वर्षे झाली तरी आपल्या मनाला का पडून रहावी ? शिवजयंतीला शिवरायांचे नाम आसमंती दुमदुमतेच ! पण एरवीही कित्येकांचे मनी त्यांचे नाव गुंजन करीत रहाते ! महाराष्ट्राच्या प्रत्येक दिवशी कुठेना कुठे त्यांचे पुण्यस्मरण होतच रहाते ! शिवराय म्हणजे अखंड स्फूर्तीचा झरा आहे... त्यांचेपेक्षा बरा असा आदर्श आपल्यापुढे अद्याप निर्माण झाला नाही ! पद्मावतच्या निमित्ताने अल्लाउद्दिन खिलजीचा उद्दामपणा आपण पाहिला,.. अनुभवला ! विंध्य पर्वत ओलांडून त्याचे आक्रमण देवगिरीला भिडले !... यादवांच्या दूदैवाने देवगिरी पडला.... आणि पुढची चारशे वर्ष उभ्या महाराष्ट्रावर पाशवी युगाचा अंधार पडला ! सतराव्या शतकात शिवरायांचे रुपाने स्वराज्याचे विचार रुजेपर्यंत .. दख्खनच्या पठारावर गुलामींची कुसळच उगवीत, त्याची सल उभ्या मराठी मातीला होती. माना खाली घालून, पाच पातशाहीच्या थपडा खात जीणं.... जगणं कसले .. मढ्यांच्या आवालादिचं ! आत्माशिवाय शरीराचं ! शिवरायांनी अशी मढी जागी केली.. त्यांना आत्मभान दिलं, त्...